मंगळवेढा –
महाराष्ट्र सुवर्ण परिवार,पंढरपूर यांच्यावतीने शुक्रवार दि.26 जून रोजी सामुदायिक मोफत व्रतबंध सोहळा,मान्यवरांचा समाजगौरव पुरस्कार आणि सुवर्णकार समाजातील गुणवंत विदयार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले असल्याची माहिती महाराष्ट्र सुवर्ण परिवार,पंढरपूरचे मुख्य प्रवर्तक,सेवानिवृत्त कृषी अधिकारी, आयुर्वेदाभ्यासक रत्नाकर रामचंद्र वेदपाठक यांनी दिली.
सदरच्य कार्यक्रमास माजी मंत्री आ.विजयकुमार देशमुख,खासदार प्रणिती शिंदे,माजी पोलिस उपमहानिरिक्षक डॉ.शहाजी सोळुंखे,ओबीसी विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापिका वृषाली लहारे,आ.समाधान आवताडे,आ.अभिजीत पाटील आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून कराडचे प्रशांतदादा पोतदार मेळाव्याचे अध्यक्षस्थान स्विकारतील.
या कार्यक्रमास महाराष्ट्र सुवर्ण परिवाराचे संस्थापक अध्यक्ष रत्नाकर वेदपाठक,कोल्हापूरचे नारायण पोतदार,पंढरपूरचे हेमंतकुमार महामुनी,मोहोळचे महेश पंडित उपस्थित राहणार आहेत.
सकाळी 8.00 ते 11.30 बटुंचे संस्कारविधी कार्यक्रम होत असून सकाळी ठिक 11.30 ते 3.00 मान्यवर व गुणवंतांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे.यावेळी गणेश गोडबोले (महामुनी) यांचा स्वरांजली ऑर्केस्ट्राचा बहारदार संगीताचा मनोरंजनात्मक कार्यक्रम होईल.
सदरच्या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपाध्यक्ष हेमंतकुमार महामुनी,सहउपाध्यक्ष विशाल दिक्षीत,अध्यक्ष प्रशांत पोतदार तसेच मनोज कासेगांवकर, प्रशांत महामुनी,सुमित पारखे,संजय वेदपाठक,अमोल दिक्षीत,सारंग वेदपाठक,मिथून महामुनी,श्रीराज वेदपाठक,अक्षय दिक्षीत,शशिकांत पोतदार,सारंग महामुनी तसेच समस्त सुवर्णकार बांधव प्रयत्नशील आहेत.
—————सोबत लोगो मेल




















