जालना : जालना जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षा परीक्षा 28 जून रोजी 20 परीक्षा केंद्रावर 264 हॉलमधे होणार आहे. सदर परीक्षा पेपर 1 सकाळी 10.30 ते 1.00 व पेपर दुपारी 2.30 ते 5.00 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. पेपर 1 साठी. 5192 व पेपर 2 साठी 6151 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी 5 झोनल अधिकारी 20 सहायक परीक्षा व 20 परीक्षा केंद्र संचाला यांची नेमणूक करण्यात आली आहे . सर्व परीक्षार्थी यांनी परीक्षेपूर्वी किमान 1 तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. सदर परीक्षा कालावधीत विविध भरारी पथके ही परीक्षा केंद्राला भेटी देणार आहेत. सदरील परीक्षेसाठी परीक्षा परिषदेकडून सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू असून त्याचे नियत्रण परीक्षा परिषद पुणे, जिल्हा परिषद जालना येथे देण्यात येणार आहे . सदरील परीक्षा ही अत्यंत पारदर्शक होण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा गृहात डिजिटल साहित्य, मोबाईल ,पेजर, कॅल्क्युलेटर इत्यादी साहित्य वापरता येणार नाही. तसेच परीक्षा परिषदे परिषदेच्या सुचनेनुसार दुपट्टा, ओढणी, बुरखा यापैकी कोणताही गणवेश महिलांनी परिधान केला तरी चालेल. तथापि संपूर्ण परीक्षा कालावधीत लाईव्ह सीसीटीव्हीमध्ये आपल्याला मानेच्या वरील भाग स्पष्ट दिसला पाहिजे, अशा सूचना आहेत .
सदरील परीक्षा ही जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होत असून सदरील परीक्षांचे जिल्हा नियंत्रक म्हणून प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बाळू खरात यांची नेमणूक करण्यात आली आहे.
Post Views: 12