बार्शी – करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या पॉक्सो प्रकरणातील आरोपी रखमा गोरे याची बार्शी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी आरोपीस ₹५०,०००/- (पन्नास हजार रुपये) जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला.
सदर गुन्ह्याची हकिकत अशी की, आरोपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीशी संपर्क साधून व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. तसेच तिचे स्क्रीनशॉट व व्हिडिओ तयार करुन ते सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिल्याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणात बचाव पक्षाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीस जामिनावर मुक्तता केली.
या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. एस. व्ही. इनामदार यांनी प्रभावीपणे बाजू मांडली तर सरकारतर्फे ॲड. डी. डी. देशमुख यांनी काम पाहिले.
Post Views: 13