
सांगोला – ठाणे येथील सिडको बस स्टॉप जवळील जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या पाणिनी सभागृहात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या अथांग सांगीतिक प्रवासावर आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर आधारित मम हृदयी आशा या विशेष ग्रंथाचे प्रकाशन उत्साही वातावरणात पार पडले. एकूण ६८ लेख असलेल्या या संग्रहात सांगोल्यातील प्रा.राजेंद्र ठोंबरे व मनिषा ठोंबरे यांच्याही लेखांचा समावेश करण्यात आला आहे. शारदा प्रकाशन, तेजस्वी फाउंडेशन आणि प्रज्ञा स्तोत्र अध्ययन वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे औचित्य साधून कवी एकनाथ शेडगे रचित ऋतू बदलले तरी आणि विजय चव्हाण रचित काव्यक्षितिज या काव्यसंग्रहांचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी लेखक प्रशांत मडपुवार आणि मनिष पंडित उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रा.प्रज्ञा पंडित यांनी तर सहकार्य प्रा.डॉ.संतोष राणे यांनी केले.
Post Views: 12