सोलापूर – शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्ष व शिवसेना वर्धापन* दिननिमित्त शिवसेना पक्ष प्रणित महाराष्ट्र कामवासणाच्या वतीने गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारमपुरी(महाराज) हस्ते व शाळेतील गुरुजनांच्या उपस्थितीत करण्यात आला
सोलापुरातील मराठी माध्यमाचे विद्यालय लोकमान्य विद्यालय व देवेंद्र विद्यालय या दोन्ही शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने बॅग वह्या आणि शालोपयोगी वस्तूंच्या वाटप करण्यात आले यावेळी कारमपुरी(महाराज) यांनी म्हणाले की,शैक्षणिक साहित्य वाटपाचे खरी गरज अशा मराठी माध्यमांच्या शाळांना आहे कारण या विद्यालयात अत्यंत गरीब कष्टकरी कुटुंबीयांचे मुले- मुली या ठिकाणी शिक्षणासाठी येतात आणि त्यांना मदतीची अत्यंत गरज असते म्हणून महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्याचे उपक्रम हाती घेतले असे म्हणाले आणि शाळा व्यवस्थापन व संस्थापन यांना मदतीची गरज असल्यास आम्ही ती मदत पूर्ण करू असेही सांगितले
सदर शालेय साहित्य वाटप प्रसंगी देवेंद्र विद्यालयाचे राजमाने सर, लोकमान्य विद्यालयाचे श्री मल्लिकार्जुन गाढवे सर, सुमित्रा गाढवे मॅडम, यांच्यासह महाराष्ट्र कामगार सेनेचे विठ्ठल कुराडकर रेखा आडकी, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा यांची उपस्थिती होती
********************************
फोटो मॅटर
—————
*शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी व शिवसेना वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने लोकमान्य विद्यालय व देवेंद्र विद्यालय या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शालेय साहित्य वाटप करण्यात आले सदर प्रसंगी विष्णुकारामपुरी (महाराज) गुरुजन वर्ग व कामगार सेनेचे पदाधिकारी दिसत आहेत*