अक्कलकोट – एज्युकेशन सोसायटीचे दिवंगत चेअरमन, दानशूर व शिक्षणमहर्षी कै. शिवशरण खेडगी यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त सी.बी. खेडगी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार पेठेतील श्री समाधी मठ परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानाचे उद्घाटन अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, व्हाईस चेअरमन अशोक हारकुड आणि संचालक चंद्रकांत स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.
अभियानादरम्यान एनएसएस व एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी समाधी मठाचा संपूर्ण परिसर स्वच्छ करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश देत समाजात स्वच्छता व जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमास समाधी मठाचे नितीन पुजारी व पुजारी परिवार, प्राचार्य डॉ. गुरुलिंगप्पा धबाले, माजी प्रा. विरभद्र मोदी, प्रा. शरणप्पा अचलेर, प्रा. जयश्री बिराजदार, डॉ. गणपतराव कलशेट्टी, प्रा. संध्या परांजपे, डॉ. चौडप्पा आणेकर, प्रा. संध्या इंगळे, प्रा. सिद्धाराम पाटील, प्रा. श्रीमंत बुक्कानुरे, प्रा. श्रीकांत जिड्डीमनी, प्रा. प्रकाश सुरवसे, प्रा. शैला गिरी, प्रा. शितल बहिरजे, प्रा. हृतिका धरणे, प्रा. प्रीती जाधव आदी उपस्थित होते.
बातमीसाठी वापरता येतील
चौकट —
कै. शिवशरण खेडगी यांच्या कार्याचा वारसा केवळ शिक्षणापुरता मर्यादित नसून समाजसेवा आणि मूल्यसंवर्धनाचाही आहे. त्यांचे स्मरण कृतीतून जपण्याचा हा प्रयत्न आहे.
– बसलिंगप्पा खेडगी
चेअरमन
Post Views: 20