सांगोला – सांगोल्यातील माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्यावतीने सहविचार केंद्र कार्यक्रमात डॉक्टर, कृषी आणि चार्टर्ड अकाउंटंट दिन साजरे करण्यात आले. याप्रसंगी डॉ.नेहा पाटील, डॉ.केतकी देशपांडे, डॉ.स्मिता गव्हाणे, माधुरी कुलकर्णी, शालन गयाळी, उषा दहिवडकर, सीमा शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या व संस्थेच्या अध्यक्षा निलिमा कुलकर्णी, कोषाध्यक्षा शालिनी कुलकर्णी, सचिव वसुंधरा कुलकर्णी, सहसचिव डॉ.केतकी देशपांडे उपस्थित होत्या. मनोगतात डॉ.नेहा पाटील यांनी उत्कर्ष विद्यालय म्हणजे सांगोल्याचे शिक्षणाचे माहेरघर आहे असे गौरवोद्गार काढले. कार्यक्रमात महिलांनी भारूड, काव्यवाचन याचे सादरीकरण करून हास्यक्लब, योग वर्ग यांची माहिती दिली. तसेच संगीत खुर्ची स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमाचे नियोजन निलिमा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नीता पोफळे, सुनिता नकाते, शकीला खतीब, अश्विनी कुलकर्णी, प्राजक्ता घोंगडे, शीतल भिंगे यांनी यशस्वीरीत्या केले.






















