बार्शी – जमिनीच्या वादातून महिलेला बेदम मारहाण करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना बार्शी येथील भीमनगर परिसरात उघडकीस आली आहे. वर्षा अनिल बोकेफोडे (वय-५७, रा. भीमनगर, बार्शी, मूळ रा. खामगाव धोत्रे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी मृत महिलेचा पुतण्या विवेक तानाजी कदम (वय-५५, रा. भुकुम, ता. मुळशी) याने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी चंदन बाळासाहेब मस्के (रा. कासारवाडी रोड, बार्शी) याच्याविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षा बोकेफोडे या बार्शी तालुक्यातील खामगाव धोत्रे येथील त्यांच्या पतीच्या निधनानंतर गेल्या १५ वर्षांपासून बार्शीतील भीमनगर भागात एकट्याच राहत होत्या. त्यांची खामगाव धोत्रे येथे सुमारे २० ते २२ गुंठे जमीन आहे. या जमिनीवर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता.
Post Views: 14