सोलापूर : सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम (२०२५-२६) अंतर्गत प्रभाग क्रमांक २२ मधील सुशील मराठी शाळा परिसर ते भैरू वस्ती येथील सोमनाथ जाधव यांच्या घरापासून जगताप यांच्या घरापर्यंत २० लाख रुपये खर्चाच्या अंतर्गत काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
नगरसेवक किसन जाधव, नगरसेविका अंबिका गायकवाड आणि नगरसेविका चैत्राली गायकवाड यांच्या पाठपुराव्यातून हा निधी मंजूर झाला. मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून कामास प्रारंभ करण्यात आला.
यावेळी शिवराज गायकवाड, चेतन गायकवाड, सोमनाथ जाधव, बालाजी गुडमेवार, संतोष आगलावे, रमेश गायकवाड, शशिकांत शिंदे, रवी ढेकळे, सुभाष गायकवाड, विनायक गायकवाड, विठ्ठल जाधव, राहुल चव्हाण, वसंत जाधव, समर्थ गायकवाड, संदीप गायकवाड तसेच परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.गेल्या अनेक वर्षांपासून खराब रस्त्यामुळे नागरिकांना वाहतुकीस अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक किसन जाधव यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून या कामासाठी निधी मंजूर करून घेतला.
यावेळी नगरसेवक किसन जाधव म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या सहकार्यामुळे प्रभाग क्रमांक २२ मधील विकासकामांना गती मिळाली आहे. कोणताही नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही, यासाठी रस्ते, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, आरोग्य व अन्य विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करून प्रभाग सर्व सुविधांनी युक्त करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
Post Views: 15