सोलापूर – आधुनिक काळातील नव नवे तंत्रज्ञानातून शेतीचा विकास करण्यासाठी निर्माण झालेल्या विविध मोबाईल अॅप्सची माहिती उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्याथींनींनी खुनेश्वर गावात जावून दिली. कृषीकन्या बनून विद्यार्थींनीनी शेतकर्यांना या आधुनिक मोबाईल अॅप्सचा कसा लाभ करून घेता येईल हेही समजावून सांगितले.
प्रात्यक्षिक दाखवताना शेतकर्यांना समजेल अशा साध्या भाषेत आधुनिक अॅप्सची माहिती देवून शेतात या मोबाईल अॅप्सच्या माध्यमातून शेतीचे व्यवस्थापन कसे करावे, हवामानाचा अंदाज कसा घ्यावा, बाजारभाव काय आहे, शेतातील फळ आणि पिकांना किड, बुरशी पासून कसे संरक्षण करावे, त्यांचे नियंत्रण कसे करावे, पाणी औषधे कसे दिले पाहिजे तसेच शासकीय योजनांची माहिती कशी घ्यावी याबाबत कृषीकन्या बनलेल्या विद्यार्थींनीनी शेतकर्यांना सविस्तरपणे माहिती दिली. त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. हा उपक्रम लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे , रावे कार्यक्रम समन्वयक अधिकारी डॉ. व्ही.टी. दावणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थींनी कृषीकन्या अंबिका फताटे,प्राची आवताडे, सुषमा पवन गोल्ला,तृप्ती कदम, एैश्वर्या बंडगर,प्रणाली रूपनर यांनी यामध्ये सहभाग घेत शेतकर्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेती करण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबवला.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















