माळशिरस – श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा १९ जुलै रोजी तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा २० जुलै रोजी माळशिरस तालुक्यात प्रवेश करीत असून माळशिरस पंचायत समितीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत या दोन्ही पालखी सोहळ्यासाठी ६१ पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे .अशी माहिती गट विकास अधिकारी रघुनाथ पांढरे यांनी दिली यावेळी पाणी पुरवठा उपभियंता जे व्ही सदावरे ,वरिष्ठ सहाय्यकएस आर करांडे उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील टँकरला पाणीपुरवठा भरण्यासाठी ३२ टँकर उपलब्ध करण्यात आले आहेत धर्मपुरी मोरोची नातेपुते माळशिरस निमगाव वेळापूर अशा सहा ठिकाणी 3 बोअर व ४२ विहीरी निश्चित करण्यात आल्या आहेत. तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील टँकरला पाणीपुरवठा करण्यासाठी चौंडेश्वरवाडी माळेवाडी यशवंत नगर महाळुंग बोरगाव खळवे अशा ठिकाणी सहाबोर व आठ विहिरी निश्चित करण्यात आलेल्या आहेत..

या ठिकाणी २६ टॅंकर उपलब्ध करण्यात आले आहेत .वरील सर्व ठिकाणी पाणी भरण्यासाठी कर्मचारी ची नियुक्ती करण्यात आलेली आहे .तसेच हे पाणी शुध्दीकरण करून आरोग्य विभागामार्फत पाणी भरण्याच्या ठिकाण दर्शवणारे फलक लावण्यात येणार आहेत.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी खालील प्रमाणे फिडींग पॉईन्टस करण्यात आले आहेत . धर्मपुरी अँड मुकुटराव भोईटे, बबन शेंडगे ,अंबिका जाधव, माधव मोरे, उत्तम चव्हाण, मोरोची ग्रामपंचायत नळ योजना, हनुमंत साळुंखे जालिंदर सुळ, राजेंद्र सुळ, आनंदराव सुळ नातेपुते सुरेंद्र दावडा, राजेंद्र दावडा, बाळासाहेब बुचडे ,रतनलाल मेहता ,नातेपुते नगरपंचायत कावडी बुवा मंदिर शेजारी. माळशिरस बाळासाहेब राऊत महादेव पिसे ,दडस,सचिन वाघमोडे , म्हेत्रे गुरुजी काशिनाथ शिंदे, आनंद पिसे, मधुकर पिसे निमगाव सुरेश वळकुंदे ,रावसाहेब मगर, विठ्ठल मगर ,अशोक मगर ,तानाजी मगर, महादेव मगर.,ग्रामपंचायत निमगाव , वेळापूर नामदेव देवकाते, संदीप यादव, माणिक चव्हाण, पांडुरंग साळुंखे, कल्याणराव चव्हाण, हनुमंत मेहेर, संदीप चंदनशिवे, विठ्ठल पिंगळे,राधाबाई पिंडले,सायली भानवसे, दिलीप बोधले, अशा ४२ विहिरी व ३ बोअर अधिग्रहण करण्यात करण्यात आल्या आहेत.
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी फीडिंग पॉईंट पुढील प्रमाणे चौंडेश्वरवाडी आगतराव गायकवाड, सदाशिव गायकवाड, माळेवाडी भीमराव फुले ,अजित तोरस्कर ,विठ्ठलराव शिंदे यशवंत नगर दिलीप गोडसे, स्वप्निल गोडसे, रमणलाल कुंभार, रत्नमाला गोडसे, दिलीप कुंभार, महाळुंग शिवाजी इंगळे ,राजीव घोगरे, बोरगाव फत्तेसिंह पाटील. खळवे उत्तम पाटील अशा आठ विहिरी व सहा बोर असे एकूण १४ पॉईंट अधिग्रहण करण्यात आले आहे






















