सोलापूर – रस्ता क्रॉस करताना अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या एका पादचाऱ्याचा उपचारादरम्यान येथील शासकीय रुग्णालयात आज मंगळवारी पहाटे दोन वाजता मृत्यू झाला .
लक्ष्मण विठ्ठल लोखंडे ( वय 70 वर्ष , राहणार गणेश नगर , मडके वस्ती सोलापूर ) असे त्या मयत पादचारी वृद्ध इसमाचे नाव आहे . ते पाच जुलै रोजी सायंकाळी घराजवळून पायी रस्ता ओलांडीत असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली होती . यात मार लागून जखमी झाल्याने त्यांना बेशुद्ध अवस्थेत येथील शासकीय रुग्णालयात मुलगा नितीन याने दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान आज पहाटे मृत्यू झाला .