सोलापूर – डेटिंग ॲप वरील ओळखीतून बोलावून घेऊन एका तरुणाला तुझे व्हिडिओ व्हायरल करतो अशी धमकी देऊन तीस हजार रुपये काढून घेतल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
समर्थ कापसे ( रा. दावत चौक, सोलापूर) , किरण अशोक राठोड ( रा. कल्याण नगर भाग- ३) रितेश बनसोडे (रा. लिमयेवाडी, सोलापूर) , स्वयम पडळकर ( रा. अंबर हॉटेलच्या पाठीमागे, सोलापूर) आणि समर्थ अमोल चव्हाण ( रा. लिमयेवाडी, सोलापूर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असूनही याबाबत अभिषेक महेश घुले (वय २८ वर्षे, रा. १० ब, प्रेरणा हौसिंग सोसायटी, विजापूर रोड, सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे .
यातील फिर्यादी व आरोपींची डेटिंग ॲप च्या माध्यमातून ओळख झाली होती . या माध्यमातून आरोपींनी फिर्यादीला ५ जुलै रोजी दुपारी सोनी कॉलेज, सैफुल विजापूर रोड, सोलापूर येथे बोलावून घेतले . तेथुन फिर्यादीस वैष्णवी फार्म हाऊसच्या पुढे असलेल्या शेतातील दगडी खोलीत घेऊन जाऊन मारहाण करुन जिवे ठार मारण्याची व फिर्यादीचा व्हिडीओ वायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादीकडुन ऑनलाईन पध्दतीने ३० हजार रुपये जबरदस्तीने काढुन घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . दरम्यान या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होताच पोलिसांनी किरण राठोड व समर्थ चव्हाण या दोघा आरोपींना अटक केली आहे .इतर तिघे आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत . सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहे .
Post Views: 33