अकलूज – पाटबंधारे विभागाकडून अकलूजच्या साठवण तलावात पाणी उशिरा सोडले जाणार असल्याने शहरवासीयांना आगामी काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी अकलूज नगरपरिषदेने शहरातील पाणीपुरवठा ३ दिवसांआड करण्याचा निर्णय घेतला आहे. टप्प्याटप्प्याने हे नवीन वेळापत्रक लागू होणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली.
पाटबंधारे विभागाकडून अकलूजच्या साठवण तलावात पाणी उशिरा सोडले जाणार असल्याने शहरवासीयांना आगामी काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी अकलूज नगरपरिषदेने शहरातील पाणीपुरवठा ३ दिवसांआड करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवार दि. १८ आणि बुधवार दि. १९ ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने हे नवीन वेळापत्रक लागू होणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि नगरपरिषदेला सहकार्य करावे. तसेच नागरिकांनी नव्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी.असे आव्हान पाटील यांनी केले आहे मागील महिन्यात सहकार महर्षी साखर कारखाना व इतर सामाजिक संघटनांनी अकलूज गावाला टँकरने पाणीपुरवठा केला अशी परिस्थिती पावसाळ्यात येत आहे याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे
पाटबंधारे विभागाने करारा प्रमाणे ३० दिवसाचे पाणी अकलुज नगरपरीषदेला दिले आहे.यंदाच्या पावसाळ्यात पाऊस पडल्या नसल्याने तालुक्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती असुन परवानाधारकांना सिंचनासाठी पाणी देणे क्रमप्राप्त आहे.त्यामुळे रुटीन प्रमाणे पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे.
श्रावण नहार अभियंता, पाटबंधारे उपविभाग माळशिरस
Post Views: 56