बार्शी – शहरांच्या आठवड्याच्या शनिवार बाजारात अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत चार नागरिकांचे एकूण ४५ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोन लंपास केल्याची घटना शनिवार, दि. ११ जुलै सकाळी घडली. या घटनेमुळे बाजारात आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लक्ष्मण शामराव लांडगे (रा. संभाजीनगर, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते शनिवारी सकाळी सुमारे ९ वाजता भाजी खरेदीसाठी बाजारात गेले होते. पत्नीशी मोबाईलवर बोलून त्यांनी मोबाईल पँटच्या मागील खिशात ठेवला. काही वेळाने भाजीचे पैसे देण्यासाठी खिशात हात घातला असता २० हजार रुपये किमतीचा मोटोरोला कंपनीचा मोबाईल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
मोबाईलचा शोध घेत असताना समाधान सुधाकर काळे, श्रीकांत वृजकिशोर गुप्ता आणि शंकर बाबुराव शिंदे यांचेही मोबाईल चोरीला गेल्याचे समोर आले. चौघांनी भाजीमंडई परिसरात शोध घेतला; मात्र मोबाईल मिळून न आल्याने त्यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. चोरीस गेलेल्या मोबाईलमध्ये मोटोरोला, विवो व ओप्पो कंपनीच्या मोबाईलचा समावेश असून, त्यांची एकूण किंमत ४५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करुन आरोपींचा शोध घेत आहेत.
Post Views: 10