
प्रशासनाला गेलेल्या तक्रारी वरून पालखी मार्गा लगत व्यवसायिकांनी कॅनॉल लगतचे जागेत अतिक्रमण केल्याने एकतर वाहतुकीची कोंडी होते . त्यातच जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर संख्या असते श्रीपूर पासून २ कि.मी. वर बोरगांव येथे पालखीचा मुक्काम असतो . त्यामुळे बोरगांव बरोबरच श्रीपूर मध्ये दिंड्यांचा मुकाम असतो . दर वर्षी पालखी सोहळ्या पूर्वी ही अतिक्रमणे हटविली जातात पालख्या गेल्यावर पुन्हा अतिक्रमणे होतात . परंतू या स्थिती मुळे जसा प्रशासनाचा नाहक खर्च होतो तसा या छोटे उद्याग करणार्याचे ही नुकसान होते . यावर प्रभावी तोडगा शासनाने काढावा अशी नागरिक व व्यवसायिकांची मागणी आहे.
– – – – – – – – – – – – – – – – – — – – – – – – – – – – – – – – जिल्हाधिकारी यांचे सुचने नुसार कारवाई .
. . . . . . .. … संतोष सावंत . मुख्याधिकारी .























