सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून आणि राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या अत्याधुनिक CCTV कॅमेऱ्यांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम रविवारी दत्त मंदिर परिसर, सिव्हिल लाईन्स येथे उत्साहात संपन्न झाला.

यावेळी नुकत्याच राज्यसभा खासदार म्हणून निवड झालेल्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांचा परिसरातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांच्या वतीने भव्य जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वामुळे महाराष्ट्रात पायाभूत सुविधा, नागरिकांची सुरक्षा आणि जनहिताच्या विकासकामांना मोठी गती मिळत आहे. त्यांच्या विशेष निधीतून सिव्हिल लाईन्स परिसरासाठी CCTV कॅमेऱ्यांचा निधी मंजूर झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेला मोठा आधार मिळणार आहे.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अमोल शिंदे, अक्कलकोट पंचायत समिती सदस्या शितल म्हेत्रे, युवा नेते सुमित पाटील, राजू आलुरे, समर्थ मोटे, संजीवनी गायकवाड, दीपक पाटील, अजिंक्य साठे, सचिन माने, राजू माने, यशवंत सोसायटी, रत्नदीप सोसायटी, शास्त्री सोसायटी, नालंदा सोसायटी, आकांक्षा सोसायटी, उज्वला सोसायटी, ज्ञानदीप सोसायटी, सह्याद्री सोसायटी, पोस्टल कॉलनी, कृषी कॉलनी, विश्राम नगर, व्यंकटेश सोसायटी आदींची उपस्थिती होती.























