पिलीव – महाराष्ट्रात पंधरा जुनपासुन शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. शाळा सुरळीतपणे सुरु होण्यास जवळपास महिन्याचा कालावधी जातो .तोपर्यंत शिक्षकांना एस .आय .आर चे काम देण्यात आले आहे.यामुळे शिक्षकांना दररोज किमान दोनशे कुटुंबाना भेटी देऊन मतदानाचा फाॅर्म भरुन घेण्यास शासनाने सांगीतले खरेतर अकरा ते पाच शाळा करुन नंतर एवढ्या कुटुंबांना एका दिवसात भेटी देणे कोणालाच शक्य नाही.

शासनाने नंतर हा निर्णय मागे घेतला व शंभर कुटुंबाना भेटी देण्याचे जाहीर केले हेही खरे तर आव्हानात्मक काम आहे.खरेतर उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक शिक्षकांना जणगणनेचे काम काहीजणांना बि एल ओचे काम ह्या त उन्हाळी सुट्टी गेली तर शाळा सुरु होते ना होते तोपर्यंत एस आय आर चे काम यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे किंवा शिकविणे याला वेळच मिळत नाही .या मुळे मुलांचे प्रचंड मोठे नुकसान होत आहे .सध्या याच कामामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांसमोर कमी वेळ तर मतदानाच्या कामामुळे लोकांमध्ये जास्त अशी परिस्थीती सध्या निर्माण झाली आहे.उन्हाळ्याचया सुट्टीत काम करणे वेगळे आणी शाळा सुरु झाल्यावर काम लावणे ज्यामुळे खरेतर शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविणे अवघड झाले आहे .अश्या या अशैक्षणिक कामामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता पुर्ण ढासळत आहे .यामुळेच पालकांमध्ये तिव्र नाराजीचा सुर पाहवयास मिळत आहेत. शिक्षकांची ही अशैक्षणिक कामे ताबडतोब बंद करण्याची पालकांमधुन मागणी होत आहे. चौकट _ आम्हा शिक्षकांना अशैक्षणिक कामांना गुंतविले असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविणे अवघड झाले आहे.शिक्षकांचा हा अशैक्षणिक बोजा शासनाने कमी करावा _ सचिन गाटे ,शिक्षक. चौकट _ शिक्षकांना अशैक्षणिक कामे लावल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. विजय मदने पाटील, पालक.























