सोलापूर – उद्योगपती मुरलीधर अरकाल यांचे जन्मदिनी औचित्य साधून हरि ओम विणकर बाग बहुद्देशीय संस्थेने त्यांनी आत्तापर्यंत सामाजिक बांधिलकी ठेवून अनेक सामाजिक उपक्रम राबविले त्याबद्दल विणकर बागेत हरि संस्थेचे अध्यक्ष बालाजी जंगम यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

संस्थेचे खजिनदार लक्ष्मीकांत दंडी आपल्या मनोगत व्यक्त करताना अरकाल हे पद्मशाली न्याती संस्थेचे विश्वस्त असून त्यांनी पद्मशाली स्मशान भूमीत अंत्यविधीला गेलेल्या लोकांना बसण्यासाठी फरशीकरण , स्वच्छता, पाण्याची सोय, अनेक रोपे लावून त्याची संगोपनाची व्यवस्था संस्थेकडून केली. त्याचप्रमाणे त्यांच्या वडिलांचे नावानी असलेले आशय्या इराय्या अरकाल शाळेला भरीव देणगी दिली. त्याचप्रमाणे मुलांना नेहानं करण्यासाठी स्कूल बस भेट दिली. पूर्वभागातील मानाचे ताता गणपती मंडळाचे विश्वस्त म्हणून काम करतात. ताता गणपती मंडळाचे सर्व कार्य त्यांच्या देखरेखाली चालतो. अक्कलकोट एम आय डी सी टेक्सटाईल उत्पादनामध्ये त्यांची सिंहाचा वाटा आहे. असे अनेक कार्य त्यांच्या हातून होत आहे. सदर कार्यक्रमाला हरि ओम संस्थेचे विश्वस्त हिरालाल धुळम, अशोक यज्जा, जगदीश बो म दयाल, इराण्णा चंशेट्टी, तसेच अनेक पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. त्याचप्रमाणे बागेतील प्रभात मंडळ, योगा ग्रुप, महिला मंडळ, सिंगर ग्रुप मोठ्याप्रमाणात उपस्थित होते
Post Views: 12