मोहोळ – अंकोली ता मोहोळ येथे पोलिसांनी भैरवनाथ भोसले याच्या वस्तीवर छापा टाकून तीन प्लॉस्टीकच्या पोत्यात ५० किलो आणि अंदाजे किंमत २० लाख १९ २५० रुपयेचा हिरव्या रंगाचा गांजा मोहोळ पोलिसांनी जप्त केला . ही कारवाई गुरुवारी सकाळी साडेसात वाजणेच्या सुमारास करण्यात आली .

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे पोलिस उपनिरीक्षक शंकर पाटील यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली अंकोली येथील भैरवनाथ भोसले यांच्या वस्तीवर पत्रा शेडमध्ये गांजा ठेवलेला आहे . त्यांनी या मिळालेली माहितीची खातरजमा करून वरिष्ठांच्या कानावर घातली. त्यांच्या परवानगीने पंचांना सोबत घेवून पोलिस स्टापसह छापा टाकला या छापा दरम्यान नरहरी भोसले यांच्या शेतातील गोट्याच्या जवळ असलेल्या पत्राशेडमध्ये झडती घेतली असता विविध पॅकेट मध्ये भरून ठेवलेला ४० किलो ३८५ ग्रॅम हिरव्या रंगाचा गांजा मिळून आला त्यांची किंमत अंदाजे प्रति किलो ५० हजार याप्रमाने २० लाख १९ २५० रुपये येवढी आहे





















