सोलापूर : बारावीनंतर पदवी शिक्षणासोबतच यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, एसएससी आणि अन्य स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी, या उद्देशाने एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी-एडीटी) विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसने (एसआयसीएस) बी.ए. (अॅडमिनिस्ट्रेशन) हा एकात्मिक अभ्यासक्रम सुरू केला असल्याची माहिती स्कूलचे संचालक डॉ. सुजित धर्मपात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेला हा अभ्यासक्रम यूपीएससी, एमपीएससी आणि बँकिंग स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत आहे. त्यामुळे पदवी शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांची नियोजनबद्ध तयारी करता येणार असून वेळ, खर्च आणि स्वतंत्र कोचिंगची गरज कमी होणार आहे.१८ व १९ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हॉटेल प्रथम, व्हीआयपी रोड, सोलापूर येथे डॉ. सुजित धर्मपात्रे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
अभ्यासक्रमात भारतीय राज्यघटना, सार्वजनिक प्रशासन, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यव्यवस्था, आंतरराष्ट्रीय संबंध, सुशासन, सार्वजनिक धोरण, चालू घडामोडी, कृत्रिम बुद्धिमत्ता, उत्तरलेखन, मुलाखत कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि नेतृत्वगुणांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, नियमित टेस्ट सिरीज, उत्तरलेखनाचा सराव, मुलाखत प्रशिक्षण आणि करिअर मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यूपीएससी, एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांतून कौशल्याधिष्ठित, मूल्याधिष्ठित आणि सामाजिक जाण असलेले अधिकारी प्रशासनात यावेत, हा आमचा उद्देश आहे,” असे, एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे
कार्याध्यक्ष तथा प्र. कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी म्हटले आहे.
या पत्रकार परिषदेस चंद्रकांत बोरुडे, प्रा. सागर शिरसागर आदी उपस्थित होते.
Post Views: 8