सोलापूर : दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त समाजामध्ये भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली.
गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम राबविण्यात आला. यावेळी राज्यपाल व मुख्यमंत्री वयांनी दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त दिलेल्या संदेशाचे वाचन प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर केले.
या उपक्रमाच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि कर्तव्यनिष्ठा या मूल्यांचे पालन करून भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, मनिषा वास्ते, विस्तार अधिकारी श्रीमती मृणालिनी शिंदे, ज्योतीराम भोसले, सुरेश राठोड, शिवानंद सोलापूरे, संदीप घोडके, शहानवाज शेख, श्रीमती सुरेखा तोंडसे, रूपाली मोरे, स्नेहा जाधव, अजीज सय्यद, श्रीकांत माने, जिलानी अंसारी, शिवानंद नागूर, गजेंद्र कुमठेकर, मिलन बिराजदार, विनायक कुंचपोर, सुधीर फुलारी, भिमाशंकर कोळी, श्रीमती अरुणा रांजणे, कैलास शिंदे, पंडित होनमाने, तसेच कंत्राटी कर्मचारी श्रीमती अश्विनी बिराजदार, दिपाली धेंडे, आरती महिंद्रकर, गौरी तुपे व युवराज यादव उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















