सोलापूर – सन २०२३ आणि २०२५ या कालावधीत महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल असलेल्या १९ वर्षीय आरोपीला शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
स्वप्निल आनंद लिंबोळे (वय १९, रा. ८१, वडार गल्ली, बुधवार पेठ, सोलापूर) असे तडीपार केलेल्या आरोपीचे नाव आहे. स्वप्निल लिंबोळे याच्याविरुद्ध सन २०२३ आणि २०२५ या कालावधीत महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या सततच्या गुन्हेगारी कारवायांमुळे फौजदार चावडी पोलीस ठाण्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर कायदेशीर कारवाई करत पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर यांनी १६ जुलै रोजी तडीपारचा आदेश काढला आहे.
Post Views: 14