माळशिरस – धर्मपुरी येथे जिल्ह्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आगमन झाले असता धर्मपुरी येथील हिरकणी कक्षाचे उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी महिला व बालविकास विभाग प्रसाद मीरकले व बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी आल्लडवाड यांच्या हस्ते झाले.

तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी वारकऱ्यांसाठी या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खूप परिश्रम घेतले. यंदा 2026 मधील आषाढी वारी निमित्त वारकरी महिलांसाठी जिल्ह्यामध्ये एकूण 167 हिरकणी कक्ष असून त्यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये माळशिरस व अकलूज या दोन्ही प्रकल्पांमध्ये एकूण सहा मुक्काम व 31 विसावे असून त्यामध्ये 50 हिरकणी कक्षाचे नियोजन करण्यात आलेले असून यामध्ये महिलांसाठी स्तनपानासाठी योग्य अशी जागा, बेड, सॅनिटरी पॅड, सॅनिटरी इन्सिनेटर मशीन,व्हेंडिंग मशीन, पिण्याचे पाणी,डस्टबिन तसेच महिला व बालविकास विभागाचे विविध योजनांचे माहिती फलक यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले सर हे स्वतः गेले चार दिवस झाले या सर्व हिरकणी कक्षांना भेटी देऊन व्यवस्थांची पाहणी करून परिपूर्ण असे नियोजन केलेले आहे. त्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी अकलूज बालाजी आल्लडवाड, माळशिरस प्रकल्प अधिकारी आस्मा आतार यांनी तसेच दोन्ही प्रकल्पातील पर्यवेक्षिका यांनी विशेष मेहनत घेतली.
Post Views: 24