सोलापूर : भवानी पेठेतील ९ वर्षीय मुलाच्या संशयित रेबीजमुळे झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी शहरातील मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव, निर्बीजीकरणातील कथित अनियमितता आणि संबंधित यंत्रणेच्या हलगर्जीपणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. मृत मुलाच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून तसेच महापालिकेच्या वतीने आर्थिक मदत देण्यासाठी सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
भवानी पेठेतील अल्पवयीन मुलाच्या संशयित रेबीजमुळे झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याची मागणी केली.
शहरातील मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि निर्बीजीकरणाच्या कामातील अनियमिततेचा आरोप करत संबंधित संस्था व अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. मृत मुलाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने मुख्यमंत्री सहायता निधीतून तसेच महापालिकेच्या वतीने आर्थिक मदत द्यावी. यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करावा, असेही त्यांनी सांगितले.
मुलाच्या संपर्कातील कुटुंबीयांसह शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार रेबीज प्रतिबंधक लसीकरण करावे,शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात आणि निर्बीजीकरणाच्या कामातील हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही पाटील यांनी केली.
Post Views: 12