Sunday, August 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अक्कलकोट भूषण व रत्न पुरस्कार सोहळा थाटात संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
August 23, 2026
in marathwada
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट – तालुक्याशी नाळ जोडलेली असतानाच पुणे शहरात नोकरी, व्यवसाय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, कला, उद्योग व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून अक्कलकोट तालुक्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव सोहळा पुण्यात उत्साहात पार पडला. गावगाथा मीडिया नेटवर्कच्या वतीने आयोजित ‘अक्कलकोट भूषण व रत्न पुरस्कार सोहळा २०२६’ थाटामाटात संपन्न झाला.
पुण्यातील नितू मांडके सभागृह, स्वारगेट, टिळक रोड येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या या सोहळ्यात अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या एकूण १५ मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
अक्कलकोट भूषण पुरस्काराने चार मान्यवरांचा सन्मान
अक्कलकोट भूषण पुरस्काराचे मानकरी म्हणून  जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले , मल्लिनाथ कलशेट्टी, माधव राजगुरू आणि शरणकुमार लिंबाळे यांचा गौरव करण्यात आला.
तर अक्कलकोट रत्न पुरस्काराने विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये मा. पौर्णिमाताई गायकवाड (IPS अधिकारी), मा. बंडोपंत कुलकर्णी (जिल्हा न्यायाधीश, पुणे), महेश बोळकोटगी (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), रविकांत पाटील (सहकार व साखर उद्योग क्षेत्र), विरभद्र हारकूड (संस्थापक अध्यक्ष, अक्कलकोट तालुका पुणे रहिवासी संघ), गणेश फुलारी (उद्योजक),  संजीवकुमार हिळ्ळी (Cinematographer),  चंद्रशेखर भांगे (पत्रकार, लोकशाही न्यूज), मा. सिद्धार्थ कापसे (युवा उद्योजक), डॉ. अमोगसिद्ध चेंडके (मराठी भाषा व संतसाहित्य अभ्यासक) आणि अॅड. सदाशिव माळगे (शैक्षणिक व सामाजिक क्षेत्र) यांचा समावेश होता.
या सोहळ्यास पुणे उपमहापौर परशुराम वाडेकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली.
“गावाशी नाळ घट्ट; दरवर्षी पुरस्कार सोहळा घेणार”
यावेळी बोलताना गावगाथा मीडिया नेटवर्कचे मुख्य संपादक धोंडप्पा नंदे म्हणाले, “आम्ही नोकरी-व्यवसायानिमित्त पुणे येथे वास्तव्यास असलो तरी आमची नाळ गावाच्या मातीशी घट्ट आहे. अक्कलकोट तालुक्यातील जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पुण्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या अक्कलकोटच्या भूमिपुत्रांचा गौरव व्हावा, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांचे मनोबल वाढावे, या भावनेतून हा उपक्रम सुरू केला आहे. यापुढे दरवर्षी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येईल.
‘समतेचा शिल्पकार महात्मा बसवेश्वर’ पुस्तकाचे प्रकाशन
या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रा. सदाशिव माळगे लिखित ‘समतेचा शिल्पकार महात्मा बसवेश्वर’ या पुस्तकाचे आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. महात्मा बसवेश्वर यांच्या समता, मानवता आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना जनमानसापर्यंत पोहोचविणाऱ्या या साहित्यकृतीचे प्रकाशन पुरस्कार सोहळ्याला वैचारिक अधिष्ठान देणारे ठरले.
आमदार सचिन कल्याणशेट्टीं कडून उपक्रमाचे कौतुक
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी गावगाथा मीडिया नेटवर्कच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, “गावगाथा मीडिया नेटवर्कने आयोजित केलेला हा पुरस्कार सोहळा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. आज धोंडप्पा नंदे यांच्या माध्यमातून मला अक्कलकोट तालुक्यातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वे आणि उत्साही तालुकावासीयांना भेटता आले, हे माझे भाग्य आहे. पुण्यात नोकरी-व्यवसायासाठी येऊन स्वतः आर्थिक संकटांचा सामना करत असतानाही तालुक्यातील जनतेसाठी धडपडणे ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे. भल्याभल्यांना जमणार नाही असे काम गावगाथा मीडिया नेटवर्कने करून दाखवले आहे. त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत.”
अक्कलकोटकरांना एकत्र आणणारा उपक्रम
या पुरस्कार सोहळ्यामुळे पुण्यात वास्तव्यास असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील कर्तृत्ववान व्यक्तींना एकत्र येण्याची, एकमेकांच्या कार्याची ओळख होण्याची आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याची संधी मिळाली. गावापासून दूर असतानाही आपल्या कार्यातून अक्कलकोटचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कल्याणराव मंठाळे, सोमेश्वर वाडी, डॉ. अमोगसिद्ध चेंडके, स्वामी चांगुले, संतोष राठोडे, प्रा. सदाशिव माळगे, अंबादास गवंडी आणि राहुल भंडारी यांनी संयोजक मंडळाच्या माध्यमातून परिश्रम घेतले.
या संपूर्ण पुरस्कार सोहळ्यामागे गावगाथा मीडिया नेटवर्कचे मुख्य संपादक धोंडप्पा नंदे यांची संकल्पना, पुढाकार आणि अक्कलकोटकरांना एका व्यासपीठावर आणण्याची भूमिका महत्त्वाची ठरली. अक्कलकोटच्या कर्तृत्ववान भूमिपुत्रांचा सन्मान करण्याची ही परंपरा यापुढेही कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
Post Views: 17
Previous Post

पिलीव येथील विजयालक्ष्मी गोरे ज्ञानयाञी आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

Next Post

स्वेरी पॉलीटेक्निकमध्ये सायबर पोलिसांच्या वतीने मार्गदर्शन सत्र संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
स्वेरी पॉलीटेक्निकमध्ये सायबर पोलिसांच्या वतीने मार्गदर्शन सत्र संपन्न

स्वेरी पॉलीटेक्निकमध्ये सायबर पोलिसांच्या वतीने मार्गदर्शन सत्र संपन्न

ताज्या बातम्या

‘मीडिया मास्टर’ पुस्तकाचा बुधवारी प्रकाशन सोहळा

‘मीडिया मास्टर’ पुस्तकाचा बुधवारी प्रकाशन सोहळा

August 23, 2026
नवीन वर्गखोली उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

नवीन वर्गखोली उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

August 23, 2026
देहू-आळंदीच्या धर्तीवर हन्नूरच्या हरणा नदीकाठी होणार घाट

देहू-आळंदीच्या धर्तीवर हन्नूरच्या हरणा नदीकाठी होणार घाट

August 23, 2026

प्लास्टिक टाळा, पर्यावरण वाचवा, प्लास्टिकला ‘नाही’ म्हणा; निरोगी भविष्यासाठी आजच सवय बदला

August 23, 2026

महसूल गळती, आश्रमशाळा अन् रस्ता सुरक्षेवर अधिकाऱ्यांची खरडपट्टी

August 23, 2026

डॉ. आर. आर. पाटील यांना करिअर डेव्हलपमेंट व ट्रेनिंग-प्लेसमेंट क्षेत्रातील दोन मानाचे पुरस्कार

August 23, 2026
सिंहगड पब्लिक स्कूलच्या सहा खेळाडूंची भारतीय संघात निवड

सिंहगड पब्लिक स्कूलच्या सहा खेळाडूंची भारतीय संघात निवड

August 23, 2026

निधी खात्यावर, कामे कागदावर; ८५ कोटी खात्यावर; विकासकामे मात्र ठप्प!

August 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1108095

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!