पंढरपूर – कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर येथे ‘१० करोड नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियान’ अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीविषयी जनजागृती निर्माण करणे आणि त्यांना निरोगी व सुदृढ जीवनशैलीकडे प्रवृत्त करणे हा होता आहे असे प्रतिपादन, प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाला प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या पंढरपूर सेवाकेंद्राच्या संचालिका बी.के. उज्वला दीदी, सहसंचालिका बी.के. स्वाती बहेन यांच्यासह बी.के. विकास भाईजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्या मॅडम यांनी सांगितले की, “सध्याच्या धावपळीच्या व ताणतणावाच्या युगात व्यसनाधीनता ही तरुणाईसमोरील मोठी समस्या बनत आहे. मानसिक स्वास्थ्य, सकारात्मक विचारसरणी आणि आत्मनियंत्रण यांच्या जोरावर आपण स्वतःसह संपूर्ण समाजाला व्यसनमुक्त करू शकतो.” यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नशामुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा देण्यात आली.
Post Views: 17