सोलापूर – शहर व जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ व श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पंढरपूर व स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर यांच्या संयुक्त
विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून 150 क्रीडा शिक्षकांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार इंटरनॅशनल कॉन्फरन्स हॉल स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पंढरपूर या ठिकाणी करण्यात आला .
या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.संतोष गवळी ( शारीरिक शिक्षण संचालक ) प्रा.सचिन गायकवाड व्यवस्थापन परिषद सदस्य , कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ.बी.पी.रोंगे ( संस्थापक स्वेरी कॉलेज पंढरपुर व अध्यक्ष एस.व्ही.आय टी सोलापूर) , प्रमुख उपस्थिती भारत इंगवले ( राज्य समन्वयक क्रीडा शिक्षक महासंघ) प्रा.संतोष खेंडे ( जिल्हाध्यक्ष सोलापूर जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ) सुहास छंचुरे ( शहराध्यक्ष सोलापूर शहर शारीरिक शिक्षण क्रीडा शिक्षक महासंघ) रणजीत लोहार ( तालुकाध्यक्ष निवड समिती सदस्य) यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार देण्यात आला
प्राध्यापक संतोष गवळी यांनी आपल्या भाषणात सर्व पुरस्कार प्राप्तक्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले व सर्वांनी आपली उत्तरोत्तर प्रगती करत राहावी व जास्तीत जास्त खेळाडू घडवावे व आपल्या प्रशालेचे व संस्थेचे नाव असेच उज्वल करावे अशी अपेक्षा व्यक्त केली
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रोंगे सर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगता मधून सर्व दीडशे पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले त्यांच्यासमवेत आलेल्या सर्व पाहुणे त्यांचे सहकारी ,मुख्याध्यापक ,प्राचार्य, संस्थेचे पदाधिकारी ,मित्रपरिवार , क्रीडा शिक्षक महासंघाच्या तालुक्याचे सर्व अध्यक्ष सचिव शहर व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांचे देखील स्वागत केले आपल्या जीवनाचा प्रवास तसेच संस्थेचा आत्तापर्यंतचा इतिहास त्यांनी सांगितलं व सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या
या कार्यक्रमास सोलापूर शहर व जिल्ह्यातील क्रीडाशिक्षक महासंघाचे सर्व तालुका अध्यक्ष सचिव व सर्व पदाधिकारी उपस्थित होते
ट्रॉफी, सन्मानपत्र, फेटा , शॉल , विठुरायांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संतोष खेंडे क्रीडा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष, प्रस्तावना राज्य समन्वयक भारत इंगवले ,पाहुण्यांची ओळख व परिचय शहराध्यक्ष सुहास छचुरे व आभार तालुकाध्यक्ष रणजीत लोहार यांनी मानले
Post Views: 13