सोलापूर : आसरा चौक ते नई जिंदगी रोड परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने मोहीम राबविली. कारवाईदरम्यान विविध प्रकारच्या हातगाड्या, टेबल, बाकडे आणि लोखंडी जाळ्या जप्त करण्यात आल्या.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार उपअभियंता अविनाश वाघमारे यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभाग प्रमुख सोपान कांबळे, कनिष्ठ अभियंता गणेश काकडे, राजेशकुमार कावळे तसेच महापालिका कर्मचारी आणि पोलिस बंदोबस्ताच्या उपस्थितीत मोहिम राबविण्यात आली.
आसरा चौक परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत दोन चारचाकी लोखंडी गाड्या, एक चारचाकी लाकडी गाडी, एक लाकडी टेबल, दोन लोखंडी बाकडे, तीन लोखंडी जाळ्या तसेच एक चारचाकी स्टील गाडी जप्त करण्यात आली. रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये आणि नागरिकांना सुरक्षित व मोकळा मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी महापालिकेची अतिक्रमणविरोधी मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा या विभागाने दिला आहे.
——
Post Views: 30