सोलापूर – आजाराला कंटाळून एका 75 वर्षीय वृद्ध महिलेने पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना देगाव रोड येथील गवळीवस्ती, लक्ष्मीपेठ येथे नुकतीच घडली.
मालनबाई सुदाम गायकवाड (वय 75 वर्ष रा.लक्ष्मीपेठ, सोलापूर) असे भाजलेल्या महिलेचे नाव आहे. मालनबाई यांनी आजारपणाला कंटाळून 21 ऑगस्ट रोजी दुपारी राहत्या घरी काडीपेटीने अंगावरील गाऊन पेटवून घेतला होता.त्यात भाजल्याने त्या येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर घरी गेल्या होत्या.
त्यानंतर याचा पुन्हा त्रास होत असल्याने त्या एकट्याच उपचाराकरिता आज सोमवारी सकाळी येथील शासकीय रुग्णालय दाखल झाल्या.
Post Views: 17