त्या प्रमाणे या परिसरातील शंभरचे वर दिव्यांग बांधवांनी नगरपंचायती समोर प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा संजीवनी बारगुळे , जिल्हा सचिव संजय जगताप , जिल्हा संपर्क प्रमुख हनुमंत चव्हाण , पंढरपूर शहर प्रमुख गणेश ननवरे माळशिरस तालुका महिला अध्यक्ष लता सातपुते , सोमनाथ पारशे, यांचे नेतत्वात आंदोलन केले यावेळी लक्ष्मण लांडगे , सोमनाथ लाटे , सलमान डांगे , चंद्रकांत शिरहट्टी , सचिन सदर, राजू रणदिवे आदी उपस्थित होते .
या वेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष सावंत यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले यामध्ये दिव्यांगांसाठी ५० % घरपट्टी माफ करावी तसेच जागा उपलब्ध करून द्यावी , नगरपंचायत हद्दीतील दिव्यांगांची सुची उपलब्ध व्हावी, Cbse व चालु निधी त्वरीत मिळावा , तसेच शासनाच्या योजनेतील प्राप्त निधीपैकी ५ % निधी राखून ठेवावा या प्रमुख पांच मागण्यांचा समावेश होता . यावर थकित निधी पंधरा दिवसात देण्यात येईल व उर्वरित मागण्या नगरपंचायतीला ठराव घेवून कार्यवाही साठी शासनाकडे पाठविणेत येईल असे लेखी आश्वासन देण्यात Twinkle दिव्यांग बांधवांनी आंदोलन स्थगित केले . परंतू दिलेल्या कालावधीत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला . यावेळी माजी उपनगराध्यक्ष भिमराव रेडे – पाटील यांनी दिव्यांग्याची मागणी योग्य असून त्यांना पुढील आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असे सांगितले .


















