वळसंग – वळसंग ( ता. द. सोलापूर) येथील श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून उत्साही वातावरणात संपन्न झाला.पर्यवेक्षक शिवानंद घोडके यांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांमधून सदफ बागवान,सादिया तडमुड,विश्वराज बिराजदार,वरद शहापुरे,सुषमा जाधव, रोशनी कोडले ,आलिया चंडके यांनी आपल्या भाषणातून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बद्दल माहिती सांगितले.तदनंतर पर्यवेक्षक शिवानंद घोडके यांनी आपल्या भाषणातून शिक्षक दिनाचे महत्त्व समजावून देऊन सर्व विद्यार्थ्यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याविषयी माहिती मिळवून वाचन करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी निलकंठ कवटगी, प्रा.संतोष शिंदे,बसवराज दुधगी, विरेश शिवशरण थळंगे,विजय प्याटी, मल्लिनाथ गौडगाव, शिवराज अष्टगी,अजय माणकोजी, शैला निंबाळ, गंगा बागलकोटी, स्नेहा हळगोदे, प्रा.प्रतिभा तांडुरे, लिपिका राजश्री दुधगी,लिपिक गौरीशंकर चनशेट्टी, प्रयोगशाळा सहायक विनोद दुधगी , कर्मचारी कट्टेप्पा कोळी, सुनिता कुर्ले उपस्थित होते. या दिनाचे औचित्य साधून चव्हाण मोटर्स सोलापूर यांच्यातर्फे उपस्थित शिक्षकांचे बुके देऊन सत्कार करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गंगाधर बिराजदार सरांनी केले..
Post Views: 14