सोलापूर :आपल्या जीवनाचे आत्मकल्याण करणे ,मोक्षमार्गाकडे जीवन समर्पित करणे, तसेच तप, त्याग, संयम या मार्गावर जाण्यासाठी संसारातून विरक्ती च्या मार्गावर जाण्यासाठी दिगंबर जैन ५ दीक्षार्थी बंधूंची बिनोली व गोदभराई कार्यक्रम श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट च्या महावीर सांस्कृतिक भवन येथे परमपूज्य पट्टाचार्य श्री विशुद्ध सागर जी महाराज यांचे शिष्य श्रमण मुनी श्री 108 सुप्रभ सागर जी महाराज,108 प्रणत सागर जी महाराज,105 वी प्रज्ञा सागर महाराज यांच्या उपस्थितीत पार पडला.
भारतातील विविध ठिकाणाहून आलेले बालब्रह्मचारी अंकित भैया (राजस्थान ), अनिकेत भैया (भिंड, मध्य प्रदेश) यश भैया (अहमदाबाद ), प्रसन्न भैया (संभाजीनगर ), वकीलचंद्रजी भैय्या (वडौत, उत्तर प्रदेश )या ५ दिक्षार्थींना दिल्लीतील लाल दिगंबर जैन मंदिर येथे परमपूज्य पट्टाचार्य 108 श्री विशुद्ध सागर महाराज हे 25 ऑक्टोबर रोजी दिगंबर दीक्षा देणार आहेत.
सोलापुरात या ५ दीक्षार्थींचे माता-पिता होण्याचे भाग्य श्री नूतन गांधी ,संतोष शहा, राजकुमार दोशी, सुदर्शन गांधी ,आणि रविकिरण मैंदर्गे यांना सौभाग्य मिळाले आहे. दीक्षार्थींच्या आहाराची चोख व्यवस्था धनश्री भाबी मेहता यांनी पार पाडली आहे.कार्यक्रमास श्री मनोज पाटील ,सांगली यांनी संगीत साथ दिली.परमपूज्य 108 श्री सुप्रभा सागर महाराज यांनी आपल्या प्रवचनात *छोटे बीच मे वृक्ष की पहचान नही है* उदाहरण देताना वडाचे प्रचंड मोठे झाड एका छोट्याशा बी मुळे निर्माण होते असे बी जे दगडात, जमिनीत घुसून दगड फोडून अक्राळ रूप घेते,बी छोटे समजून त्याकडे दुर्लक्ष करू नये *छोटा पॅकेट बडा धमाका* कोणालाही छोटे समजू नये,असे सांगितले.एक एक थेंब जमा होऊन विशाल समुद्र तयार होतो,*छोटे बुंद को इग्नोर मत करो* कपडा फाडते ती कात्री परंतु एक रुपयाची सुई जोडण्याचे काम करते,सुई ची किंमत करा,चिमूटभर मीठ जेवणाची, अन्नाची चव वाढवते,गंगा नदीचा उगम पर्वताच्या एका छोट्या जागेतून होतो परंतु ती पुढे अथांग प्रवाहात वाहते .
*छोटी बातों से बडी शुरुवात होती है,कमल का बीज छोटा होता है अंत मे बडा सुंदर कमल खिल जाता है* दीक्षार्ती बंधूंची बिनोली महोत्सव ,मेहंदी, गोधभराई,बगीतून सह वाद्य मिरवणूक, मिष्ठान्न भोजन सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन सांस्कृतिक मंत्री प्रा .मनीष शहा,संजोग गांधी, सुनील गांधी, संजय शहा,सुहास शहा,साहिल शहा,बाहुबली शहा,धनंजय शहा,ईशान गांधी,किशोर मेहता,वनकुद्रे,चेतन शहा यांनी केले. पावस योग समिती ,सकल जैन समाज,श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट सोलापूर यांच्या वतीने कार्यक्रमाची नेटके नियोजन करण्यात आले होते.
Post Views: 18