सोलापूर – शाळेची वैभवशाली परंपरा टिकवून ठेवायची असेल तर सर्व शिक्षकांनी तन-मन लावून काम केले पाहिजे. असे प्रतिपादन नगर जिल्ह्यातील कोकमठाण येथील मुख्याध्यापक निरंजन डांगे यांनी केले.
छत्रपती शिवाजी प्रशालेतील राजश्री शाहू सभागृहात मराठा समाज सेवा मंडळ आणि यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या शिवतीर्थ व शारदा आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण डांगे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर मनोहर सपाटे हे होते. याप्रसंगी संस्थेचे सरचिटणीस प्रा महेश माने, संचालक अशोक चव्हाण, शिवदास चटके, अलका सुरवसे, सुरेश पवार,राजेंद्र शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संस्थाध्यक्ष सपाटे म्हणाले, शिक्षकांचा मान इतर पदांपेक्षा मोठा असून आजच्या बिघडलेला सामाजिक परिस्थितीला योग्य वळण लावण्याचे काम शिक्षकच करू शकतात. त्यामुळे त्यांनी तसा संकल्प केला पाहिजे.
यावेळी आशा राठोड, प्रीती गावडे, सुनंदा पाटील , नंदा रंगदाळ, प्रा. वाल्मिकी कीर्तिकर, राजाराम शितोळे, संतोष अलकुंटे, उत्तरेश्वर लवटे, या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शिवतीर्थ व शारदा पुरस्काराने गौरवण्यात आला. या कार्यक्रमास तानाजी माने, नितीन मोटे, सुजाता जुगदार, मंजुश्री पाटील, मोहम्मद शेख, किशोर बनसोडे, उषा गोकळे, उदय पवार, अनिता कांबळे, श्रीराम बरगंडे, सुनिता निकम, दत्ता भोसले, भानुदास घन्दुरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविक ज्ञानेश्वर सपाटे यांनी केले. तर सूत्रसंचालन सारिका पंडित यांनी केले. आभार विनायक पाटील यांनी मांडले.
——————————————
प्रा. गवळी यांच्याकडून सात लाखाची देणगी
छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजचे शारीरिक शिक्षक संचालक प्रा संतोष गवळी यांनी आपल्या निवृत्ती निमित्त विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी संस्थेकडे सात लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला. त्यानिमित्त त्यांच्या संस्थेच्या वतीने अध्यक्ष माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Post Views: 31