बार्शी – क्रीडा युवक संचनालय पूणे व बीड जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्यावतीने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेत ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब बार्शी व घाटशिळा,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,बीडचा खेळाडू यशराज रोडे याने १९ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.
यशराजला संस्थेचे अध्यक्ष भगवान जाधव, फुलचंद जावळी, उपाध्यक्ष गणेश रोडे, सचिव सौ. सविता जाधव, सौ.स्नेहल रोडे, प्राचार्य सानप, क्रीडाशिक्षक मुंढे व कोकाटे व अनिल खराडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. संस्थेच्या व प्रशिक्षक यांच्यावतीने संचिती जाधव, अतुल जाधव, विश्वजीत जाधव, रितेश जानराव, पृथ्वीराज रोडे या सर्व प्रशिक्षकांनी यशराजचे अभिनंदन केले व पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.