दि. 09 सप्टेंबर : ज्येष्ठ पत्रकार, लेखक, व्याख्याते आणि विविध सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक चळवळींचे अभ्यासक मकरंद शशिकला सुधाकर मुळे* यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश बौद्धिक प्रकोष्ठच्या सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून सदर नियुक्ती जाहीर केली आहे. बौद्धिक प्रकोष्ठ प्रभारी विश्वास पाठक यांनी प्रकोष्ठ रचना करण्यासाठी विशेष पुढाकार घेतला.
वैचारिक आणि बौद्धिक क्षेत्रात सातत्याने कृतीशील योगदान देणारे साहित्य, कला, संस्कृती आणि सामाजिक विषयात महाविद्यालयीन जीवनापासून सक्रिय आहेत.






















