सोलापूर – मंदिरात पूजा करण्याला विरोध करून तिघा जणांना दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील सावरगाव शिवारातील नागनाथ मंदिरात आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता घडली.
मलिकार्जुन दिलीप स्वामी (वय 30 वर्षे), कल्याण मल्लिकार्जुन स्वामी (वय 61 वर्ष) आणि संगमेश्वर कल्याण स्वामी (वय 31 वर्ष, तिघे राहणार सावरगाव) अशी मारहाण झालेल्या तिघांची नावे आहेत. वरील तिघेजण आज शुक्रवारी सकाळी सावरगाव शिवारातील नागनाथ मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते. मंदिरात पूजा करीत ते बसलेले असताना त्यांना पूजा करण्यास विरोध करून रामेश्वर किसन तोडकरी, अरविंद भडंगे, विजय तानवडे, सचिन तानवडे व इतर दहा ते पंधरा जणांनी मिळून लाथाबुक्याने व दगडाने मारहाण केली. यात तिघांना सर्व अंगाला मुका मार लागल्याने ते उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात दुपारी दीड वाजता दाखल झाले.
Post Views: 14