सोलापूर – मनपा जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या वतीने सॉफ्टबॉल सबजुनियर मुले व मुली शहर व जिल्हा निवड चाचणी स्पर्धा रविवार 13 सप्टेंबर रोजी श्री मल्लिकार्जुन हायस्कूल हत्तुरे नगर विमानतळ समोर येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. या निवड चाचणीसाठी येताना खेळाडूंनी आधार कार्डची झेरॉक्स व आवश्यक साहित्यसह मैदानावर उपस्थित रहावे. खेळाडूंची जन्मतारीख ही 1/1/ 2012 नंतरची असावी. यामधून निवडलेला संघ हा दिनांक 20 ते 22 सप्टेंबर दरम्यान छत्रपती संभाजी नगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होईल. खेळाडूंनी मैदानावर संघटनेचे सचिव प्रा.संतोष खेंडे (9850666795) अथवा गंगाराम घोडके 9423717277 यांच्याशी संपर्क साधावा. या निवड चाचणी स्पर्धेसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर पाटील, उपाध्यक्ष प्रा.संतोष गवळी यांनी केले आहे.
Post Views: 6