सोलापूर – गणेशोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानी लाडक्या गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आली. शिंदे परिवाराच्या उपस्थितीत श्री गणरायाची मनोभावे पूजा-अर्चा करून आरती करण्यात आली.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी विघ्नहर्त्या श्री गणरायाच्या चरणी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. जिल्ह्यावर निर्माण झालेले संकटाचे सावट दूर व्हावे, सर्वदूर समाधानकारक आणि दमदार पाऊस पडावा, शेतशिवार हिरवेगार व्हावे, पिकांना नवसंजीवनी मिळावी आणि बळीराजाच्या कष्टाला यश मिळून त्याच्या घरात समृद्धी नांदावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
( मेल वरील फोटो लावणे)
तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबात सुख, समाधान, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. नागरिकांच्या जीवनातील अडचणी दूर होऊन नव्या आशा, नव्या संधी आणि प्रगतीची नवी दारे खुली व्हावीत, अशी मनोकामना त्यांनी बाप्पाच्या चरणी व्यक्त केली.
“बाप्पाचे आशीर्वाद आणि वडीलधाऱ्यांचे संस्कार सार्वजनिक जीवनात निरंतर जनसेवा करण्याचे आत्मिक बळ देतात. जनकल्याण आणि शाश्वत विकासाची वाटचाल श्री गणरायाच्या आशीर्वादाने अशीच अविरत सुरू राहावी,” अशी भावना खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
Post Views: 11