सोलापूर : शहराचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या जुनी मिल चाळ येथील निवासस्थानी सोमवारी श्री गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोंड्याल कुटुंबीयांच्या निवासस्थानी सकाळपासूनच भक्तिमय वातावरण होते.
रामकृष्ण कोंड्याल आणि संगीता कोंड्याल यांच्या हस्ते श्री गणरायाची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. प्राणप्रतिष्ठापना, पूजन आणि आरती धार्मिक वातावरणात पार पडली. यावेळी कोंड्याल कुटुंबीयांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेत शहरवासीयांच्या सुख-समृद्धीसह सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.
याप्रसंगी महापौर विनायक कोंड्याल, धनश्रीताई कोंड्याल, पृथ्वीराज कोंड्याल, वीरश्री कोंड्याल यांच्यासह कोंड्याल कुटुंबीय उपस्थित होते.
गणरायाच्या आगमनाने जुनी मिल चाळ परिसरातही आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. गणेशोत्सव काळात कोंड्याल यांच्या निवासस्थानी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सोलापूरकरांचे आरोग्य, सुख-समृद्धी आणि शहराची प्रगती यासाठी गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.
Post Views: 8