Monday, September 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

खतासाठी रांगा लावण्याची गरज नाही ;  मोबाईलवरूनच करा आगाऊ नोंदणी ! 

तरुण भारतbyतरुण भारत
September 14, 2026
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांसमोर रांगा लावण्याची शेतकऱ्यांची गैरसोय आता कमी होणार आहे. कृषी विभागाने खत विक्री प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी ‘खत विक्री व्यवस्थापन’( फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल) मोबाईल प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना घरबसल्या जवळच्या दुकानातील उपलब्ध खतसाठ्याची माहिती मिळणार असून, आवश्यक खताची आगाऊ नोंदणीही करता येणार असल्याचे सोलापूर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांनी मोबाईलवरून आपल्या शेतजमिनीच्या क्षेत्रानुसार आवश्यक खताची आगाऊ नोंदणी करायची आहे. नोंदणी केल्यानंतर संबंधित विक्रेत्याला ते खत शेतकऱ्याला उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे खत उपलब्ध आहे की नाही, यासाठी दुकानांच्या फेऱ्या मारण्याची किंवा सकाळपासून रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही.
आगाऊ नोंदणी केल्यानंतर पुढील दोन दिवसांत शेतकरी अथवा त्याच्या कुटुंबातील प्रतिनिधीने संबंधित विक्रेत्याकडून खत घेणे आवश्यक आहे. त्यामुळे खताची उपलब्धता निश्चित झाल्यानंतर शेतकऱ्यांना नियोजनबद्ध पद्धतीने खरेदी करता येणार आहे.
खत विक्री करताना छापील कमाल किरकोळ किमतीपेक्षा अधिक दर आकारता येणार नाही. तसेच अनुदानित खतासोबत औषधे, द्रवरूप खते, टॉनिक किंवा अन्य कृषी निविष्ठा खरेदी करण्याची सक्ती विक्रेत्यांना करता येणार नाही. अशी सक्ती होत असल्यास शेतकऱ्यांनी तातडीने कृषी विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या सुविधेचा वापर करताना अडचण आल्यास गावातील कृषी सखी, कृषी मित्र, समूह सहाय्यक, आत्मा यंत्रणेतील अधिकारी, कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल.
खत खरेदी अधिक पारदर्शक करण्यासोबतच शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि पैसा वाचविण्यासाठी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
( या बातमीसाठी सोलापूर जिल्हा परिषद आणि कृषीचा फोटो लावणे)
कोट
“खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना दुकानासमोर रांगेत उभे राहण्याची गरज भासू नये, तसेच खत विक्रीमध्ये पारदर्शकता राहावी, यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी मोबाईलवरून उपलब्ध खतसाठ्याची माहिती घेऊन आवश्यक खताची आगाऊ नोंदणी करावी. अनुदानित खतासोबत अन्य कृषी निविष्ठा घेण्याची सक्ती होत असल्यास शेतकऱ्यांनी तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा.”
— हरिदास हावळे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
Post Views: 8
Previous Post

बाप्पाच्या चरणी शेतकऱ्यांसाठी सुख-समृद्धीची प्रार्थना

Next Post

महापौरांच्या घरीही आले गणपती बाप्पा #solapurnews #news #aajsolapur #latestnews #viral #maazsolapur

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

महापौरांच्या घरीही आले गणपती बाप्पा #solapurnews #news #aajsolapur #latestnews #viral #maazsolapur

ताज्या बातम्या

कंदलगाव, गुंजेगावात महिनाभर पाणी, मग मंद्रूपचे शेतकरी पाण्यापासून वंचित का ?

September 14, 2026
देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

September 14, 2026
कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

September 14, 2026
सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

September 14, 2026

आजोबा गणपतीचे थाटात झाले पूजन ….#viral #solapurnews #aajsolapur #latestnews #maazsolapur

September 14, 2026

अज्ञात कारणावरुन कोरफळे येथे महिलेची आत्महत्या

September 14, 2026

अलीपूर येथून २६ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता

September 14, 2026

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीचे शोषण

September 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1207782

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!