Monday, September 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कंदलगाव, गुंजेगावात महिनाभर पाणी, मग मंद्रूपचे शेतकरी पाण्यापासून वंचित का ?

तरुण भारतbyतरुण भारत
September 14, 2026
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – मंद्रूप आणि परिसरामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पाऊस न पडल्यामुळे हाता तोंडाशी आलेली तूर, मूग, मटकी, सोयाबीन, भुईमूग, मका, उडीद यासह इतर पिके डोळ्यांदेखत वाळून चालली आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन प्रशासनाने कॅनलला तात्काळ पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी बाजार समिती संचालक मनीष देशमुख यांच्याकडे कैफियत मांडली असून, पंचायत समिती सदस्य मळसिद्ध मुगळे यांनीही प्रशासनाकडे कॅनलला पाणी सोडण्याची मागणी केली आहे. मात्र, इतकी गंभीर परिस्थिती असूनही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल किंवा कारवाई होताना दिसत नसल्याने शेतकऱ्यांमधुन तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कारभारावर गंभीर आरोप केले आहेत. शेजारील कंदलगाव आणि गुंजेगाव परिसरात गेल्या एक महिन्यापासून कॅनलला पाणी उपलब्ध आहे. मात्र, केवळ मंद्रूप परिसरालाच दुजाभाव करून पाणी सोडण्याचे जाणीवपूर्वक टाळले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. एकाच भागातील इतर गावांना पाणी मिळत असताना, मंद्रूप परिसरातील पिके पाण्याविना जळून खाक होत आहेत, यावरून प्रशासनाचा पक्षपातीपणा उघड होत असल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे.
यंदाच्या हंगामात सुरुवातीला झालेल्या किरकोळ पावसानंतर मंद्रूप परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून पावसाचा पत्ता नाही. यामुळे जमिनीतील ओलावा संपुष्टात आला असून कडक उन्हामुळे उभी पिके करपून चालली आहेत. शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरण्या केल्या होत्या, मात्र आता पिके जळून चालल्याने लागवड खर्चही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीतही कमालीची घट झाली आहे. या भागात कॅनलचे जाळे उपलब्ध असूनही केवळ प्रशासकीय अनास्थेमुळे पाणी सोडले जात नाही. जर कॅनलला तात्काळ पाणी सोडले नाही, तर उरलेली पिकेही पूर्णपणे नष्ट होतील. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ बैठक घेऊन मंद्रूप परिसरासाठी कॅनलचे पाणी तात्काळ सोडावे, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने आपली दुजाभावाची भूमिका न बदलल्यास आगामी काळात शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मंद्रूप परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
….
चौकट
…
वारंवार मंद्रूपच्या शेतकऱ्यांवर अन्याय
..
शासनाच्या टेल टू हेड याप्रमाणे कॅनलचे पाणी सोडण्यात येते. मात्र नेहमी मंद्रूपचा परिसर टेल असून पाहण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते. अनेक शेतकरी पाण्याच्या भरोशावर पिकांची पेरणी व लागवड करतात. मात्र ऐन वाढीच्या काळात पाण्याने दगा दिल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. वारंवार मंद्रूप परिसर सोडून इतर ठिकाणी कॅनॉलचे पाणी येत असताना येथील शेतकऱ्यांवरच अन्याय का ? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे
…
पाणी न सोडल्यास कार्यालयाला कुलूप ठोकणार
….
सध्या पावसाळा असूनही उन्हाळ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पेरणी केलेल्या पिकांना सध्या पाण्याची गरज आहे. अशावेळी लाभधारक शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवून पाटबंधारे विभाग सापत्न वागणूक देत आहे. कंदलगाव व गुंजेगाव परिसरात महिनाभर पाणी असतानाही मंद्रूपच्या शेतकऱ्यांना आठ दिवसही पाणी मिळत नाही. हा दुजाभव आगामी काळात दूर न केल्यास व आठ दिवसात कॅनलला पाणी न सोडल्यास पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे तालुकाध्यक्ष जावेद आवटे यांनी दिला आहे.
….
मंद्रूप परिसरातील पेरणी केलेल्या पिकांना उन्हाच्या तीव्रतेमुळे सध्या पाण्याची तीव्र आवश्यकता आहे. बाजार समिती संचालक मनीष देशमुख यांनी पाटबंधारे विभागाकडे पाणी सोडण्याचे मागणी केली आहे. मात्र पाटबंधारे त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आठ दिवसात पाणी न सोडल्यास आमदार सुभाष देशमुख यांच्यामार्फत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे मंद्रूप जिल्हा परिषद सदस्या सोनाली कडते यांनी सांगितले .

Post Views: 24
Previous Post

देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

तरुण भारत

तरुण भारत

ताज्या बातम्या

कंदलगाव, गुंजेगावात महिनाभर पाणी, मग मंद्रूपचे शेतकरी पाण्यापासून वंचित का ?

September 14, 2026
देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

September 14, 2026
कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

September 14, 2026
सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

September 14, 2026

आजोबा गणपतीचे थाटात झाले पूजन ….#viral #solapurnews #aajsolapur #latestnews #maazsolapur

September 14, 2026

अज्ञात कारणावरुन कोरफळे येथे महिलेची आत्महत्या

September 14, 2026

अलीपूर येथून २६ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता

September 14, 2026

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीचे शोषण

September 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1207820

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!