वळसंग : वळसंग (ता.द.सोलापूर) येथील श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत सेवक म्हणून कार्यरत असलेल्या श्री कट्टेप्पा अंदप्पा कोळी यांना सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, सोलापूर मार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले.सदर पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रम संतराज पॅलेस ,बुलेट शोरूम समोर इसबावी पंढरपूर येथे संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सुभाष माने हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विभागाचे शिक्षक आमदार मा.जयंत आसगावकर ,लेखा अधिकारी शिक्षण खाते सोलापूरचे श्रीकांत देवडीकर यांच्यासह सोलापूर जिल्हा माध्य व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने , विद्यासचिव विष्णू मस्के, सचिव श्रीशैल पाटील व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.वरील सर्व पदाधिकार्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्कार कट्टेप्पा कोळी यांना मानाचा फेटा बांधून शाल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करून सपत्नीक गौरविण्यात आले .
सदर कार्यक्रमास प्राचार्य वीरेश थळंगे, पर्यवेक्षक शिवानंद घोडके, तानाजी जमादार , संजयकुमार धनशेटृटी,सिदधाराम भैरामडगी, बाळकृष्ण गुंड,निलकंठ कवटगी, श्रीमंत भोसले, गंगाधर बिराजदार,प्रा.संतोष शिंदे, बसवराज दुधगी,वीरेश थळंगे, संतोष कस्तुरे, विजय प्याटी,शिवराज अष्टगी, यांच्यासह सेवक कट्टेप्पा कोळी यांचे मातोश्री साळुबाई कोळी,धर्मपत्नी भौरम्मा कोळी तसेच इतर कुटुंबीय व पाहुणे मंडळी उपस्थित होते.
Post Views: 27