सोलापूर : ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त इंडियन मॉडेल स्कूल येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महापौर विनायक कोंड्याल यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी महापौर कोंड्याल यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. कार्यक्रमादरम्यान महापौरांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत सेल्फी घेत आनंदाचे क्षण अनुभवले. महापौरांनी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करत त्यांच्या अनुभवांना आणि सामाजिक योगदानाला महत्त्व असल्याचे सांगितले.कार्यक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. महापौरांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत घेतलेला सेल्फीचा क्षण उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला.
Post Views: 11