पिलीव – माळशिरस तालुक्यासह पिलीव परिसरात यंदा भिषण दुष्काळी परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. सध्या पावसाळा संपल्यातच जमा पण अद्यापपर्यंत पिलीवसह, कुसमोड, झिंजेवस्ती, सुळेवाडी,बचेरी, शिंगोर्णी सह संपुर्ण माळशिरस तालुक्यातच पाऊस झालाच नाही .यामुळेच अगदी ऑक्टोबर महीन्यातच एप्रिल, मे महीन्यात जशी परिस्थिती असते तशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सुळेवाडी,बचेरी, शिंगोर्णी या भागात सध्या पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, तसेच माणसांना अन्न धान्य याची तिव्र टंचाई आहे. खरेतर माळशिरस तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश झाला आहे. शासनाने अधिकाऱ्यांना पंचनामे करण्यास सांगीतले असुन कॅनाॅल खालील भागातही कसलाच पाऊस नाही .कॅनाॅलवरील पाण्यामुळे सध्या थोडीफार पिके आहेत पण या भागात सुद्धा ओढे, नाले, बंधारे कोरडेच आहेत याचा आधार घेत अधिकारी या भागातील शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास येत आहेत. पण मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी पंचनामा ही एक मदत देण्यासाठी औपचारिक प्रक्रीया आहे .शेतकऱ्यांना कोणीही वेठीस धरू नये या अडचणीच्या काळात सर्व शेतकऱ्यांना मदत देण्याची भुमीका आहे. माञ काही अधिकारी जाणुन बुजुन टाळाटाळ करीत असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे. कोणत्याही प्रकारच्या जाचक अटी व निकष न लावता शासनाने शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी पिलीव परिसरातील शेतकऱ्यांमधुन होत आहे. माळशिरस तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश झाला आहे. माञ शासनाने कोणत्याहीजाचकअटी न लावता मदत दयावी याचे निकष माञ अद्यापपर्यंत समोर आलेले नाहीत. निश्चित शासन कोणत्या पिकांना किती मदत देणार ,खरीप हंगामातील पिकांना किती मदत मिळणार फळबागांना व ऊसाला हेक्टरी किती मदत मिळणार. कोणत्याही जाचक अटी ,निकष न लावता सर्व शेतकऱ्यांना सरसकट शासनाने मदत दयावी अशी मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे.दिवाळीपूर्वी ताबडतोब मदत दयावी अशी मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे. _ चौकट _ याबाबत माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांना विचारले असता माळशिरस तालुक्याचा दुष्काळी तालुक्यामध्ये समावेश झाला असुन शासन सर्वतोपरी शेतकऱ्यांना मदत करेल, पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर, जनावरांना चारा ,जी काही मदत असेल ती सर्व मदत शासन करणार असुन माळशिरस तालुक्यातील एकही शेतकरी मदतीपासुन वंचीत राहणार नाही .यासाठी अधिकार्यांना तश्या सुचना दिलेल्या असुन या परिस्थिती शासन पुर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असुन सर्वतोपरी शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे सांगीतले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















