Wednesday, October 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

माजी आमदार दत्तात्रय सावंत यांचे अखेरच्या क्षणी धक्का तंत्र

तरुण भारतbyतरुण भारत
October 7, 2026
in west maharashtra
0
माजी आमदार दत्तात्रय सावंत यांचे अखेरच्या क्षणी धक्का तंत्र
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी अपक्ष म्हणून तसेच रासप पक्षाकडून देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे पुणे विभागीय शिक्षक मतदार संघाची निवडणूक ही अतिशय चुरशीची आणि बहुरंगी होणार असल्याचे दिसत आहे.
दरम्यान मंगळवारी (ता.६) रासप पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्या नंतर माध्यमांशी बोलताना माजी आमदार सावंत यांनी सांगितले की, सोमवारी (ता.५) आपण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही पुणे विभागाची निवडणूक आहे. या निवडणूकी मध्ये खूप मोठा भौगोलीक क्षेत्राचा भाग आहे. या विस्तीर्ण असणाऱ्या पाच जिल्ह्याच्या मतदार संघा मध्ये अपक्ष म्हणून आपण २०१४ मध्ये निवडून आलेलो होतो. मात्र २०२० मध्ये झालेल्या निवडणूकीत मी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविलेली असताना काही अडचणी किंवा समस्या आपल्या समोर आलेल्या होत्या किंबहुना असे म्हणण्या पेक्षा त्या तयार केल्या गेलेल्या होत्या. त्या समस्येच्या उत्तरा मध्ये जाण्याची वेळ त्या वेळी आपणाला मिळाली नव्हती. मात्र त्याचा अभ्यास मी या पाठीमागच्या सहा वर्षामध्ये केला आणि आपण कशा प्रकारे निवडणूकीला समोरे जायचे याबद्दल खुणगाठ बांधली. कारण समोरचे राजकीय पक्ष आणि राजकारणी मंडळी ही क्रुर अशा पध्दतीच्या खेळी करतात त्याला उत्तरा दाखल बेस्ट पध्दतीने पुढे गेलं पाहिजे हे ठरवून आपण मंगळवारी आपला दुसरा उमेदवारी अर्ज रासप पक्षाकडून दाखल केला आहे.  त्यामुळे खात्रीने रासप या पक्षाची भूमिका आणि शिक्षक यांना सोबत घेऊन जाण्याचे ठरवून आजचा हा उमेदवारी अर्ज आपण दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली.
——————-
चौकट : ( महायुतीकडून उमेदवारीची अपेक्षा केली होती )
मी महायुतीकडून उमेदवारीची अपेक्षा केलेली होती. कारण माझा जो पाच जिल्ह्यातील शिक्षक बांधव आहे या बांधवांची धारणा आणि भूमिकेचा भाग होता की आपण यामध्ये उमेदवारी करत असताना राजकीय पक्ष असला पाहिजे. कारण ज्या अडचणी आलेल्या होत्या त्या अडचणी येवू नये म्हणून पाच जिल्ह्यातील माझे शिक्षक बांधव सांगत होते आणि शेवटी सत्तेत असणारे सरकार,विरोधात बसलेले विरोधी पक्ष हे राजकीय मोठे पक्षच असतात. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील आपले चांगले संबंध आहेत. माझ्या आमदारकीच्या काळात तसेच २०१९ च्या कार्यकाळात शिक्षण क्षेत्रातील अनेक मोठे प्रश्न घेऊन त्यांच्या कडे गेलेलो होतो. त्या मध्ये फडणवीस यांनी जातीने लक्ष घालून ते मार्गी लावली होती. पाठीमागच्या कार्यकाळात देखील आपण त्यांच्याकडे जातो आहे. माझा त्यांच्याशी स्नेह आहे. मी त्या ठिकाणी त्यांच्याकडे भूमिका मांडणे आणि शिक्षणाच्या क्षेत्रातील सर्व समस्या सोडवून घेणे हे माझे कार्यकर्ता म्हणून काम आहे आणि ते मी करतो आहे. त्याचाच भाग म्हणून आपण उमेदवारीची देखील महायुतीकडे मागणी केली होती पण ती मिळाली नाही. त्यामुळे त्याची देखील आपणाला खंत नाही. कारण ऐकटे मुख्यमंत्री फडणवीस उमेदवारी बाबत निर्णय घेत नसतात. त्यांचा पक्ष, त्या पक्षाचे वरिष्ठ नेतेमंडळी, कोअर कमिटी या सर्वांचा उमेदवारी बाबतचा सामुदायिक निर्णय असतो असेही आमदार सावंत यांनी आवर्जून सांगितले.
—————–
चौकट : ( शिक्षक असल्याने माझे ३६ तासांचे वेळापत्रक तयार आहे ) महाविकास आघाडी आणि महायुती हे खूप मोठे राजकीय पक्ष आहेत. त्यांच्या विषयी माझ्या खूप मोठा सन्मान आहे. मी शिक्षक आहे. माझे ३६ तासांचे वेळापत्रक तयार करणारा आणि त्याचा अंमल करणारा असा मी शिक्षक असल्यामुळे माझ्या मध्ये आणि त्या मोठ्या पक्षांमध्ये वेगवेगळ्या कँटेगिरी मध्ये खूप मोठा फरक आहे. मी फक्त विद्यार्थ्यांचे हित शिक्षकांचे कल्याण समृध्द झालेला महाराष्ट्रातील शैक्षणिक वारसा हा भविष्यामध्ये मला घेऊन जाता येईल पध्दतीने धारणा घेऊन मी पुढे जातोय. त्यामुळे मला या क्षेत्रामधील बहुतेक मंडळी जी शिक्षणाच्या क्षेत्रात खरोखर वंदनीय काम करीत आलेली आहेत अशा सर्वांचा मला पाठिंबा आहे असे माझे मन मला सांगतय आणि म्हणूनच मी या निवडणूकीला सामोरे जातोय असेही सावंत यांनी सांगितले.
——————-
चौकट : ( मैत्रिपुर्ण लढती झाल्या पाहिजेत )
आपल्याच तालुक्यातील बी.पी.रोंगे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे या बद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सावंत यांनी सांगितले की, रोंगेसर ही मोठी व्यक्ती आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांचे देखील काम आहे. अनेक अडथळे पार करीत ते इथे पर्यंत आलेले आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांच्या बद्दल देखील आपल्यामना मध्ये मोठा आदरभाव आहे. ते देखील निश्चितपणे निवडणूक लढतील. कारण मैत्रीपुर्ण लढती झाल्या पाहिजेत असे डाँ.बाबासाहेब आंबेडकरानीच या प्रणाली मध्ये घालून दिलेले आहे. विधानसभा किंवा लोकसभा या मध्ये एक मत असतंय आणि बाकीच्यांना सोडून द्यावयाचे असतंय. पण इथं तसं नाहीये प्रत्येक मतदार हा बुध्दीवादी आहे. किमान ग्र्ज्युएट आणि पोस्ट ग्रज्युएयट नव्हे तर शिक्षण क्षेत्रातील उच्च अशा पदव्या धारण केलेला हा मतदार असल्यामळे तो त्या ठिकाणी पसंतीचे काम क्रम देवून जेवढे पण उमेदवार उभे राहिले आहेत त्या सगळ्यांना ते आपआपल्या बुध्दीच्या कसोटीवरती पाहून त्या ठिकाणी पसंतीचा क्रम देतील. रोंगेसरांच्या बरोबर माझी मैत्रीपुर्ण लढत झाली तर मला त्याचा आनंद आहे असेही सावंत यांनी सांगितले.
——————–
चौकट : ( संपुर्ण विभागाचा हा विषय आहे )
भाजपाकडून दोन्ही उमेदवार हे कोल्हापूर जिल्ह्यातीलच दिले गेले या बद्दल आपले मत काय यावर बोलताना सावंत म्हणाले, राजकीय पक्षांना ते स्वातंत्र्य आहे कुठे उमेदवारी त्यांनी द्यावी त्यांचा तो हक्क आहे आणि त्यांनी त्यांच्या अभ्यासानुसार त्या उमेदवारी दिलेल्या असतील कोल्हापूर जिल्ह्यातला शिक्षक किंवा या उरलेल्या चार जिल्ह्यातला शिक्षक हा जिल्हा म्हणून काही बघेल पण त्यापेक्षाही ज्यादा तो पाच जिल्ह्याचा हा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे सगळे शिक्षक एकत्र येवून निवडणूक जरी पाच जिल्ह्याची लागली असली तरीर महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांचा शिक्षणाचा आणि संपुर्ण व्यवस्थेचा हा विषय आहे. त्यामुळे हा जिल्हा किंवा तालुका याला सीमा असा टाकू आपण शकत नाही असे देखील सावंत यांनी स्पष्ट केले.
Post Views: 19
Previous Post

बार्शीचा पाणीप्रश्न घेऊन आमदार दिलीप सोपल थेट जिल्हाधिकारी कार्यालयात

Next Post

सणासुदीपूर्वी महापालिकेची विशेष सखोल स्वच्छता मोहीम सुरू 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सणासुदीपूर्वी महापालिकेची विशेष सखोल स्वच्छता मोहीम सुरू 

ताज्या बातम्या

जयभारत समाजसेवा व नवरात्र महोत्सव मंडळाची अध्यक्ष पदी रमेश धनुरे

जयभारत समाजसेवा व नवरात्र महोत्सव मंडळाची अध्यक्ष पदी रमेश धनुरे

October 7, 2026
विश्वजीत रोलर स्केटिंग क्लासेस खेळाडू यशराज रोडे याची शालेय विभागीय स्केटींग स्पर्धेसाठी निवड

विश्वजीत रोलर स्केटिंग क्लासेस खेळाडू यशराज रोडे याची शालेय विभागीय स्केटींग स्पर्धेसाठी निवड

October 7, 2026
हुतात्मा स्मृती मंदिराचा होणार आता कायापालट

हुतात्मा स्मृती मंदिराचा होणार आता कायापालट

October 7, 2026
‘नेमकं MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे की राजकीय?’, राजेंद्र राऊतांचा सवाल, रोहित पवारांवर नावानिशी निशाणा

‘नेमकं MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे की राजकीय?’, राजेंद्र राऊतांचा सवाल, रोहित पवारांवर नावानिशी निशाणा

October 7, 2026
२५ वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; अष्टविनायक नगरमध्ये सभामंडपाचे भूमिपूजन

२५ वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; अष्टविनायक नगरमध्ये सभामंडपाचे भूमिपूजन

October 7, 2026
महात्मा गांधी जयंती साजरी

महात्मा गांधी जयंती साजरी

October 7, 2026
मेनोपॉज (रजोनिवृत्ती) काळातील महिलांच्या आरोग्यविषयक समस्या

मेनोपॉज (रजोनिवृत्ती) काळातील महिलांच्या आरोग्यविषयक समस्या

October 7, 2026
पावसासाठी ५१ नद्यांच्या पवित्र जलाने शिवलिंगांचा जलाभिषेक

पावसासाठी ५१ नद्यांच्या पवित्र जलाने शिवलिंगांचा जलाभिषेक

October 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1313106

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!