पंढरपूर – पुणे विभाग शिक्षक मतदार संघातून माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी अपक्ष म्हणून तसेच रासप पक्षाकडून देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे पुणे विभागीय शिक्षक मतदार संघाची निवडणूक ही अतिशय चुरशीची आणि बहुरंगी होणार असल्याचे दिसत आहे.
दरम्यान मंगळवारी (ता.६) रासप पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्या नंतर माध्यमांशी बोलताना माजी आमदार सावंत यांनी सांगितले की, सोमवारी (ता.५) आपण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही पुणे विभागाची निवडणूक आहे. या निवडणूकी मध्ये खूप मोठा भौगोलीक क्षेत्राचा भाग आहे. या विस्तीर्ण असणाऱ्या पाच जिल्ह्याच्या मतदार संघा मध्ये अपक्ष म्हणून आपण २०१४ मध्ये निवडून आलेलो होतो. मात्र २०२० मध्ये झालेल्या निवडणूकीत मी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविलेली असताना काही अडचणी किंवा समस्या आपल्या समोर आलेल्या होत्या किंबहुना असे म्हणण्या पेक्षा त्या तयार केल्या गेलेल्या होत्या. त्या समस्येच्या उत्तरा मध्ये जाण्याची वेळ त्या वेळी आपणाला मिळाली नव्हती. मात्र त्याचा अभ्यास मी या पाठीमागच्या सहा वर्षामध्ये केला आणि आपण कशा प्रकारे निवडणूकीला समोरे जायचे याबद्दल खुणगाठ बांधली. कारण समोरचे राजकीय पक्ष आणि राजकारणी मंडळी ही क्रुर अशा पध्दतीच्या खेळी करतात त्याला उत्तरा दाखल बेस्ट पध्दतीने पुढे गेलं पाहिजे हे ठरवून आपण मंगळवारी आपला दुसरा उमेदवारी अर्ज रासप पक्षाकडून दाखल केला आहे. त्यामुळे खात्रीने रासप या पक्षाची भूमिका आणि शिक्षक यांना सोबत घेऊन जाण्याचे ठरवून आजचा हा उमेदवारी अर्ज आपण दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली.
——————-
चौकट : ( महायुतीकडून उमेदवारीची अपेक्षा केली होती )
मी महायुतीकडून उमेदवारीची अपेक्षा केलेली होती. कारण माझा जो पाच जिल्ह्यातील शिक्षक बांधव आहे या बांधवांची धारणा आणि भूमिकेचा भाग होता की आपण यामध्ये उमेदवारी करत असताना राजकीय पक्ष असला पाहिजे. कारण ज्या अडचणी आलेल्या होत्या त्या अडचणी येवू नये म्हणून पाच जिल्ह्यातील माझे शिक्षक बांधव सांगत होते आणि शेवटी सत्तेत असणारे सरकार,विरोधात बसलेले विरोधी पक्ष हे राजकीय मोठे पक्षच असतात. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील आपले चांगले संबंध आहेत. माझ्या आमदारकीच्या काळात तसेच २०१९ च्या कार्यकाळात शिक्षण क्षेत्रातील अनेक मोठे प्रश्न घेऊन त्यांच्या कडे गेलेलो होतो. त्या मध्ये फडणवीस यांनी जातीने लक्ष घालून ते मार्गी लावली होती. पाठीमागच्या कार्यकाळात देखील आपण त्यांच्याकडे जातो आहे. माझा त्यांच्याशी स्नेह आहे. मी त्या ठिकाणी त्यांच्याकडे भूमिका मांडणे आणि शिक्षणाच्या क्षेत्रातील सर्व समस्या सोडवून घेणे हे माझे कार्यकर्ता म्हणून काम आहे आणि ते मी करतो आहे. त्याचाच भाग म्हणून आपण उमेदवारीची देखील महायुतीकडे मागणी केली होती पण ती मिळाली नाही. त्यामुळे त्याची देखील आपणाला खंत नाही. कारण ऐकटे मुख्यमंत्री फडणवीस उमेदवारी बाबत निर्णय घेत नसतात. त्यांचा पक्ष, त्या पक्षाचे वरिष्ठ नेतेमंडळी, कोअर कमिटी या सर्वांचा उमेदवारी बाबतचा सामुदायिक निर्णय असतो असेही आमदार सावंत यांनी आवर्जून सांगितले.
—————–
चौकट : ( शिक्षक असल्याने माझे ३६ तासांचे वेळापत्रक तयार आहे ) महाविकास आघाडी आणि महायुती हे खूप मोठे राजकीय पक्ष आहेत. त्यांच्या विषयी माझ्या खूप मोठा सन्मान आहे. मी शिक्षक आहे. माझे ३६ तासांचे वेळापत्रक तयार करणारा आणि त्याचा अंमल करणारा असा मी शिक्षक असल्यामुळे माझ्या मध्ये आणि त्या मोठ्या पक्षांमध्ये वेगवेगळ्या कँटेगिरी मध्ये खूप मोठा फरक आहे. मी फक्त विद्यार्थ्यांचे हित शिक्षकांचे कल्याण समृध्द झालेला महाराष्ट्रातील शैक्षणिक वारसा हा भविष्यामध्ये मला घेऊन जाता येईल पध्दतीने धारणा घेऊन मी पुढे जातोय. त्यामुळे मला या क्षेत्रामधील बहुतेक मंडळी जी शिक्षणाच्या क्षेत्रात खरोखर वंदनीय काम करीत आलेली आहेत अशा सर्वांचा मला पाठिंबा आहे असे माझे मन मला सांगतय आणि म्हणूनच मी या निवडणूकीला सामोरे जातोय असेही सावंत यांनी सांगितले.
——————-
चौकट : ( मैत्रिपुर्ण लढती झाल्या पाहिजेत )
आपल्याच तालुक्यातील बी.पी.रोंगे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे या बद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सावंत यांनी सांगितले की, रोंगेसर ही मोठी व्यक्ती आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांचे देखील काम आहे. अनेक अडथळे पार करीत ते इथे पर्यंत आलेले आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांच्या बद्दल देखील आपल्यामना मध्ये मोठा आदरभाव आहे. ते देखील निश्चितपणे निवडणूक लढतील. कारण मैत्रीपुर्ण लढती झाल्या पाहिजेत असे डाँ.बाबासाहेब आंबेडकरानीच या प्रणाली मध्ये घालून दिलेले आहे. विधानसभा किंवा लोकसभा या मध्ये एक मत असतंय आणि बाकीच्यांना सोडून द्यावयाचे असतंय. पण इथं तसं नाहीये प्रत्येक मतदार हा बुध्दीवादी आहे. किमान ग्र्ज्युएट आणि पोस्ट ग्रज्युएयट नव्हे तर शिक्षण क्षेत्रातील उच्च अशा पदव्या धारण केलेला हा मतदार असल्यामळे तो त्या ठिकाणी पसंतीचे काम क्रम देवून जेवढे पण उमेदवार उभे राहिले आहेत त्या सगळ्यांना ते आपआपल्या बुध्दीच्या कसोटीवरती पाहून त्या ठिकाणी पसंतीचा क्रम देतील. रोंगेसरांच्या बरोबर माझी मैत्रीपुर्ण लढत झाली तर मला त्याचा आनंद आहे असेही सावंत यांनी सांगितले.
——————–
चौकट : ( संपुर्ण विभागाचा हा विषय आहे )
भाजपाकडून दोन्ही उमेदवार हे कोल्हापूर जिल्ह्यातीलच दिले गेले या बद्दल आपले मत काय यावर बोलताना सावंत म्हणाले, राजकीय पक्षांना ते स्वातंत्र्य आहे कुठे उमेदवारी त्यांनी द्यावी त्यांचा तो हक्क आहे आणि त्यांनी त्यांच्या अभ्यासानुसार त्या उमेदवारी दिलेल्या असतील कोल्हापूर जिल्ह्यातला शिक्षक किंवा या उरलेल्या चार जिल्ह्यातला शिक्षक हा जिल्हा म्हणून काही बघेल पण त्यापेक्षाही ज्यादा तो पाच जिल्ह्याचा हा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे सगळे शिक्षक एकत्र येवून निवडणूक जरी पाच जिल्ह्याची लागली असली तरीर महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांचा शिक्षणाचा आणि संपुर्ण व्यवस्थेचा हा विषय आहे. त्यामुळे हा जिल्हा किंवा तालुका याला सीमा असा टाकू आपण शकत नाही असे देखील सावंत यांनी स्पष्ट केले.
Post Views: 18