महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य तेलुगु साहित्य अकादमी द्वारा आयोजित डॉ.लक्ष्मीनारायण बोल्ली स्मृती साहित्य सोहळा मर्दा मंगल कार्यालय, सोलापूर येथे उत्साहात पार पडला.प्रथम मान्यवरांच्या हस्ते तेलुगु तल्ली आणि डॉ.लक्ष्मीनारायण बोल्ली यांच्या प्रतिमेचे पूजन करून द्वीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम व महाराष्ट्र गीताने करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना दयानंद भालेराव यांनी केले तर स्वागत पर मनोगत शोभा बोल्ली यांनी व्यक्त केले.तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयम सोलापूरचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम यांचा सहयोगाबद्दल शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.प्रमुख पाहुणे डॉ.रणधीर शिंदे आपल्या मनोगतात डॉ.लक्ष्मीनारायण बोल्ली तेलुगु मराठी साहित्याचे सेतू होते.त्यांनी तेलुगुतील चांगले व दर्जेदार साहित्य मराठीत अनुवादित केले आहे. त्यांनी मराठी व तेलगू साहित्याला एका अनुबंधात बांधण्याचे काम केले त्यांच्या प्रेम कविता, निसर्ग कविता व भावनात्मक कविता आजही अजरामर आहेत.त्यांचा नावाचा पुरस्कार मला मिळाला याचा मला अभिमान आहे असे मत व्यक्त केले.यानंतर आपल्या अध्यक्षीय समारोपात प्रा.डाॅ.मोहन पत्तीपाका यांनी डॉ.लक्ष्मीनारायण बोल्ली आणि तेलुगु ज्ञानपीठ पुरस्कार विजेते सी.नारायणरेड्डी यांचे साहित्यविषयक आठवणी सांगून स्मृती जागृत केल्या.यांनतर तेलुगु मराठी कवी संमेलनात गोविंद काळे यांनी “देव” ही कविता, सोमण्णा गदवाल यांनी “उंडाली उडाली”कविता, राजेंद्र भोसले यांनी “सुंदर”ही कविता, रेणुका बुधारम यांनी “वेच्चनी बोत्ता” ही कविता,ममता बोल्ली यांनी “रंध्री रंध्री माझ्या” ही कविता,अनिल वासम यांनी “जीवन” ही कविता, वंदना कुलकर्णी यांनी “लक्ष्मी” ही कविता तर नरेंद्र गुंडेली यांनी “अंदगा”ही कविता सादर केली.या सर्व कविता बोल्ली यांच्या निवडक काव्यसंग्रहातील सादर करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.यानंतर सर्व कवींचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यानंतर नटराज नृत्य विद्यालयामार्फत ओमकार स्वरूपा,ओम नमः शिवाय,हे गणराया, स्त्री भृण हत्या,वाळवंटी रंगले ह्या गीतांवर नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता बोल्ली यांनी केले तर आभार प्रदर्शन हरिष ईरनाक यांनी मानले.महाराष्ट्र राज्य तेलुगु साहित्य अकादमीचे समन्वयक अशोक कंटे यांनी सदरच्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.तसेच या कार्यक्रमाला तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयम सोलापूरचे विशेष सहयोग लाभले.या कार्यक्रमाला शोभा बोल्ली,त्यांचे कुटुंबीय, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड श्रीनिवास क्यातम, उपाध्यक्ष प्रा.श्रीनिवास कोंडी,कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण सोलापूरचे प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर व शिक्षकवृंद तसेच तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयम कार्याध्यक्ष बालराज बोल्ली, सचिव तिप्पणा गणेरी, सहसचिव प्रभाकर भिमनाथ, सदस्य पेंटप्पा गड्डम, संजीव नादरगी,शरद बोल्ली,मोहन बोल्ली,प्रा.अजय दासरी ,ग्रंथपाल विजयालक्ष्मी गुडूर, श्रीनिवास गणेरी,शंकर द्यारकोंडा, बाळकृष्ण आंबट, पुरूषोत्तम बुधारम,किसन आडम, पुष्कराज गोंरटला व उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयचे उपाध्यक्ष गोपीकृष्णा वड्डेपल्ली, पूर्व भागातील ज्येष्ठ उद्योजक, नागरिक व रसिक श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
Post Views: 20