सांगोला – सांगोल्यातील शहीद अशोक कामटे संघटनेनी कलबुर्गी रेल्वेला ५ ठिकाणी थांबे मंजूर करण्याची केलेली मागणी रेल्वे प्रशासनाकडून अखेर मान्य करण्यात आली आहे. दिवाळी गर्दीच्या हंगामात प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या कोल्हापूर-कलबुर्गी रेल्वेला माढा, मोहोळ, अक्कलकोट रोड, दुधनी आणि गाणगापूर रोड या स्थानकांवर थांबे मंजूर झाल्याने या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. अक्कलकोट रोड आणि गाणगापूर रोड येथे थांबे मंजूर झाल्यामुळे भाविकांना प्रवास करणे अधिक सोयीचे होणार आहे. याशिवाय माढा, मोहोळ आणि दुधनी परिसरातील प्रवाशांनाही या विशेष रेल्वेचा लाभ घेता येणार आहे. शहीद अशोक कामटे संघटनेच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
Post Views: 13