त्यात आता भर पडली म्हणजे भाजपाचे कमळ चिन्हावर एकमेव निवडून आलेले प्रकाश नवगिरे यांची त्यांचे म्हणण्या नुसार नुकताच उपनगराध्यक्ष भिमराव रेडे – पाटील यांच्या अविश्वास ठराव आणला गेला त्या ठरावास पाठींबा देण्याच्या बदल्यात मला नगराध्यक्ष करावे असा प्रस्ताव समोर ठेवला होता यास बहुसंख्य नगरसेवकांनी लेखी संमती दिली परंतू अद्याप मला नगराध्यक्ष केले नाही म्हणून आपली नाराजी व्यक्त करत ही बाब भाजपा पक्ष श्रेष्ठीच्या समोर मांडणार असल्याचे सांगितले .
महाळुंग – श्रीपूर Considered मध्ये मोहीत – पाटील गटाचे भिमराव रेडे – पाटील व नानासाहेब मुंडफणे यांची सत्ता होती तर राहूल रेडे – पाटील (भाजपा) हे विरोधी गटात होते . यात अंतर्गत कलहाने नानासाहेब मुंडफणे यांचा ४ नगसेवकांच गट बाहेर पडून त्यांनी भाजपाने भिमराव रेडे – पाटील यांच्या उपनगराध्यक्ष पदावर अविश्वास ठरावास संम्मती दिली . त्यामुळे अविश्वास ठराव मंजूर झाला .
त्या ठरावाच्या वेळेस जे नगरसेवक एकत्र आले होते त्यांनी मला लेखी नगराध्यक्ष पदाचे समर्थन देवूनही राहूल रेडे – पाटील गट ( भाजपा ) मला दिलेले आश्वासन पूर्ण करत नाही असा आरोप प्रकाश नवागिरे करीत असून ही असूया कशा साठी असा प्रश्न उपस्थित करून याबाबत भाजपा पक्ष श्रेष्ठी कडे न्याय मागणार असल्याचे सांगतात .
एकूणच पाच वर्षाचा नगरपंचायती लेखा जोखा पाहता एकी कडे बरेच वर्ष अधिकार्यां विना पोरकी असलेली व राजकारणा मुळे गटा तटात विभागलेली विकासा पासून कोसू दूर राहीलीली अशीच नोंद नगरपंचायतीच्या कारभाराची दिसून येतात .






















